Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSantosh Deshmukh : धनंजय देशमुख यांचा आक्रमक पवित्रा, टॉवरवर चढून आत्मदहनाचा इशारा

Santosh Deshmukh : धनंजय देशमुख यांचा आक्रमक पवित्रा, टॉवरवर चढून आत्मदहनाचा इशारा

बीड । Beed

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. तरी अद्याप याप्रकरणातील एक आरोपी फरार आहे. तर इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.

- Advertisement -

त्यातच आता संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मस्साजोगमधील ग्रामस्थांकडून सध्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखही सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास टाकीवरून उडी घेण्याचा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्यांची अतिशय निर्दयपणे व क्रूरतेने हत्या करण्यात आली. त्याला ३५ दिवस झाले, तरीही कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही मोकाटच आहे. तसंच इतर आरोपींच्या मोबाइलचे सीडीआर काढले का?, संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी कॉल व व्हिडीओ कॉल कोणाला केले? सरपंच देशमुख खून प्रकरणाच्या तपासाबाबत आपल्याला माहिती दिली जात नाही. खंडणी ते खून प्रकरणातून कोणाला तरी वाचवण्यात येतेय काय?, अशी शंका आपल्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोपी सुटले, तर त्यांच्या हाताने आपल्याला व कुटुंबीयांना संपविण्यात येणार आहे. त्यामुळे आम्हीच टॉवरवर चढून वरून खाली उडी मारून आपले जीवन संपवण्याचा निर्णय गंभीर्यपूर्वक व विचारपूर्वक घेतल्याचे धनंजय देशमुख यांनी काल सांगितले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...