अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
आगामी मुदत संपणार्या जिल्ह्यातील 1223 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षणे निश्चित करण्यात आली आहेत. त्याचे राजपत्र ग्रामविकास विभागाने जारी केले आहे. त्यानुसार थेट जनतेतून सरपंच निवडताना किती ग्रामपंचायतीसाठी कोणते आरक्षण असेल याबाबतची घोषणा या विभागाने केली आहे. यात मुदत संपणार्या आगामी काळात निवडणुका होणार्या 1223 ग्रामपंचायतींतील 624 खुला वर्ग तर 300 पदे ओबीसींसाठी असतील.
- Advertisement -
यापैकी 50 टक्के महिलांसाठी राखीव असल्याने खुल्या प्रवर्गातील 312 तर ओबीसीपैंकी 165 सरपंचपद महिलांसाठी आरक्षित असेल. अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंच पदे 150 असून त्यापैकी 75 महिलांसाठी. अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंच पदे 119 असून त्यापैकी 60महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत.




