Friday, April 25, 2025
Homeनगरसरपंचांचे मानधन दुप्पट; शासन निर्णय जारी

सरपंचांचे मानधन दुप्पट; शासन निर्णय जारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत शासन निर्णयही जारी झाला आहे. त्यामुळे या निर्णयाचा लाभ नगर जिल्ह्यासह राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांना होणार आहे.

- Advertisement -

या शासन निर्णयानुसार आता 0 ते 2000 लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीतील सरपंचांना आता 6000, उपसरपंचास 2000 रुपये, 2001 ते 8000 लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीतील सरपंचांना 8000, उपसरपंचास 3000रूपये, 8001पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीतील सरपंचांना 10000, उपसरपंचास 4000 रूपये मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा आदेश शासन निर्णय जारी होताच लागू झाला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...