श्रीरामपूर (प्रतिनिधी)
श्रीरामपूरकर आतूरतेने वाट पहात असलेल्या दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पो २०२६ महोत्सव दि. १२ फेब्रुवारीपासून येथील थत्ते मैदानावर भरणार असून विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या शॉपिंग एक्स्पोचे मुख्य प्रायोजक श्री इंम्पेक्स द फर्निचर मॉल असून सहप्रायोजक म्हणून साई आदर्श पतसंस्था यांचे सहकार्य लाभले आहे. या महोत्सवासाठी ग्राहकांना कुठल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नाही.
शॉपिंग एक्स्पो २०२६ सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत ग्राहकांसाठी खुला असणार आहे. या शॉपिंग महोत्सवामध्ये विविध गृहोपयोगी वस्तू, विविध उपकरणे, विविध औषधे तसेच टू व्हिलर, फोर व्हिलर अशा विविध छोट्या वस्तूंपासून मोठ्या वस्तूंपर्यंतचे प्रदर्शन व विक्री याठिकाणी केली जाणार आहे. बरोबरच विविध खाद्यपदार्थाचा आस्वादही याठिकाणी घेता येणार आहे. खरेदी वस्तू खाद्यपदार्थ याबरोबरच विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही याठिकाणी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत संपन्न होणार आहेत.
या महोत्सवाचा शुभारंभ दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. या महोत्सवामध्ये ग्राहकांना विविध वास्तूंची खरेदी, विविध खाद्यपदार्थांचा अस्वाद ासोबतच विविध मनोरंजनाचा आनंदही लूटता येणार आहे. मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये दि. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सोलो डान्स, दि. १४ फेब्रुवारी रोजी ग्रुप डान्स तसेच दि. १५ फेब्रुवारी सायंकाळी ६ ते ९ यावेळेत खास महिलांकरिता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे.
दि. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नामवंत कलाकारांचा अविष्कार असलेला ऑर्केस्ट्राचेही आयोजन करण्यात आले आहे. दि. १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सोलो डान्ससाठी स्थानिक हौसी कलाकारांनी सार्वमत कार्यालयात नावनोंदणी करावी, तसेच दि. १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ग्रुप डान्स साठीही नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





