Tuesday, March 25, 2025
Homeनगरदैनिक सार्वमत आयोजित ‘शॉपिंग एक्स्पो 2025’ आजपासून ग्राहकांसाठी खुला

दैनिक सार्वमत आयोजित ‘शॉपिंग एक्स्पो 2025’ आजपासून ग्राहकांसाठी खुला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील थत्ते मैदानावर सलग पाच वर्षापासून होत असलेला दैनिक सार्वमत आयोजित शॉपिंग एक्स्पो 2025 महोत्सव याहीवर्षी होत असून आज गुरुवार दि.30 जानेवारीपासून विविध मान्यवरांच्या हस्ते ग्राहकांसाठी खुला होणार आहे. हा महोत्सव सलग पाच दिवस म्हणजे 3 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री पर्यंत ग्राहकांसाठी खुला राहणार आहे.

- Advertisement -

दै. सार्वमत सलग पाचव्यांदा श्रीरामपूर येथील थत्ते मैदान येथे भव्य शॉपिंग महोत्सवाचे आयोजन करत असून या महोत्सवाचा शुभारंभ आज साई आदर्श मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटीचे संस्थापक शिवाजीराव कपाळे, किसान कनेक्टचे किशोर निर्मळ, श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, पोलीस उपाधिक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील गुप्ता, पोपट भगीरथ महाले सराफचे ओम महाले, श्रीइम्पेक्स फर्निचरचे अभिजित कुदळे व राजेंद्र भोंगळे, डी. एम. मुळे चष्मावालाचे पुरुषोत्तम मुळे, सोमनाथ रघुनाथ महाले ज्वेलर्सचे सोमनाथ महाले, कृष्णा कलेक्शनचे पुरुषोत्तम झंवर, राजपालचे अरुण कतारे, सद्गुरू ग्रुपचे सर्जेराव मुंढे आदी मान्यवरांच्याहस्ते पार पडत आहे.

या महोत्सवाचे सहप्रायोजक म्हणून वासन टोयोटा व साई आदर्श मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी यांचे सहकार्य लाभले आहे. शहरातील तसेच तालुक्यातील ग्राहकांसाठी दै. सार्वमत शॉपींग महोत्सव आज दि. 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुला असणार आहे. या महोत्सवासाठी कुठल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नाही.
या शॉपिंग महोत्सवामध्ये विविध गृहोपयोगी वस्तू, विविध उपकरणे, विविध औषधे तसेच टू व्हिलर, फोर व्हिलर अशा विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे. सर्व ग्राहकांना खरेदी बरोबरच विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद तसेच मनोरंजानात्मक कार्यक्रमांचा लाभ घेता येणार आहे.

दि. 31 जानेवारी रोजी सायंकाळी 1 ली ते 7 वी पर्यंतच्या मुला-मुलींचे सोलो डान्स, दि. 1 फेब्रुवारी रोजी खास महिलांसाठी अँकर प्रवीण प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा’ तर दि.2 फेब्रुवारी रोजी खुल्या गटातील मुला-मुलींचे सोलो डान्स होणार आहे. यामध्ये स्थानिक कलाकारांचा कलाविष्कार पहायला मिळणार आहे. शेवटच्या दिवशी दि. 3 फेब्रुवारी रोजी पुन्हा खास महिलांकरिता ‘खेळ पैठणीचा’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. दि. 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या दरम्यान आयोजित दै. सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2025 चा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोलो डान्ससाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
या खरेदी महोत्सवानिमित्त दि. 31 जानेवारी व दि. 2 फेब्रुवारी रोजी आयोजित सोलो डान्ससाठी स्थानिक हौसी कलाकारांनी सार्वमत कार्यालयात आजच नावनोंदणी करावी. दोन्ही कार्यक्रमांसाठी प्रथम नोंदणी करणार्‍या मर्यादित कलाकारांना संधी दिली जाणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी ऐनवेळी येणार्‍यास संधी दिली जाणार नाही. त्यामुळे आपली नावनोंदणी आजच करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...