Friday, July 5, 2024
Homeब्रेकिंग न्यूजअल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताचे सॅम्पलच बदलले

अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताचे सॅम्पलच बदलले

ससून रुग्णालयातील डॉक्टर अटकेत

पुणे | Pune
पुण्यातील कल्याणीनगर भागात बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत केलेल्या अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन मुलगा दारुच्या नशेत नसल्याचे दाखविण्यासाठी ससूनच्या दोन डॉक्टरांनी त्याच्या रक्ताचे सॅम्पलच बदलल्याचे समोर आले आहे. याच आरोपाखाली पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

- Advertisement -

या प्रकरणी डॉ. अजय तावरे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ही अटक झाली आहे. डॉ. अजय तावरे हे सध्या ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले. मात्र, हा धनाढ्य बिल्डर पुत्र कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी ससूनमधील दोन वरिष्ठ डॉक्टरांनी त्याच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केली.

रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार झाल्याचे लक्षात येताच पुणे पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना अटक केली. सध्या पुणे पोलीसांकडून डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची कसून चौकशी सुरू आहे. या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाईल. मात्र, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आता या घटनेनंतर पुण्यातील ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले असून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा धारेवर धरले असून ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा आहे? असा संतप्त सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. याबाबत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला असून पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की ‘गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा असा परखड सवाल उपस्थित केला आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
“आधी ललित पाटीलचे धंदे याच हॉस्पिटलमधून सुरु होते. ललित पाटीलचे अवैध धंदे सरकारमधील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरू होते हे महाराष्ट्राला माहिती आहे. आता पुण्याच्या आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केली, असे म्हणत पुण्यातील हॉस्पिटल गुंड आरोपी यांच्यासाठी आहे का? असा संतप्त सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या