Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशअयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी 'त्यांनी' बनवलं जगातील सर्वात मोठं कुलूप; वजन अन् किंमत...

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी ‘त्यांनी’ बनवलं जगातील सर्वात मोठं कुलूप; वजन अन् किंमत पाहून तुम्हीही व्हाल थक्क

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

अयोध्येतील (Ayaodhya) श्रीराम मंदिराचे (Ram Mandir) सध्या अत्यंत वेगाने बांधकाम सुरु आहे. या कामासाठी अनेकांना हातभार लावण्याची इच्छा असून अनेक जण मदतीचा हातभार लावत आहेत. आता उत्तरप्रदेशच्या अलीगढमधील एका कारागिराने निर्माणाधीन राम मंदिरासाठी जगातील सर्वात मोठ्या कुलूपाची निर्मिती केली आहे. हे कुलूप तयार करण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यभराची कमाई लावली आहे. सत्य प्रकाश शर्मा (Satya Prakash Sharma) असे त्यांचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत सत्य प्रकाश यांनी सांगितले की, त्यांचे पूर्वज एक शतकाहून अधिक काळ हाताने कुलूप तयार करत आहेत. ४५ वर्षांहून अधिक काळ ते अलिगढमध्ये कुलूप तयार करण्याचे आणि पॉलिश करण्याचे काम करत आहेत. वर्षाच्या अखेरीस हे कुलूप राम मंदिर व्यवस्थापनाला भेट देण्याचा विचार करत असल्याची त्यांनी म्हटले आहे.

भर बैठकीत अंबादास दानवे आणि संदीपान भुमरेंमध्ये जुंपली, थेट अंगावर गेले धावून… VIDEO व्हायरल

सत्य प्रकाश यांच्या पत्नी रुक्मणी यांनी सांगितले की, यापूर्वी आम्ही सहा फूट लांब आणि तीन फूट रुंद असे कुलूप तयार केले होते. मात्र काही लोकांनी मोठे कुलूप बनवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आम्ही त्यावर काम सुरू केले. कुलूप तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला अलीगढ वार्षिक प्रदर्शनात हे कुलूप प्रदर्शित करण्यात आले होते. सध्या सत्य प्रकाश हे या कुलूपामध्ये किरकोळ बदल आणि सजावट करण्यात व्यग्र आहेत. सत्य प्रकाश शर्मा यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रुक्मिणी देवी यांनीही या कामात हातभार लावला आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधींची तब्बल १३६ दिवसांनंतर संसदेत दिमाखदार एन्ट्री; Video व्हायरल

‘अशी’ आहे कुलुपाची खासियत

सत्य प्रकाश शर्मा यांनी जगातील सर्वात मोठे ४०० किलो वजनाचे कुलूप स्वत:च्या हाताने तयार केले आहे. हे कुलूप तयार करण्यासाठी त्यांनी गेली अनेक महिने मेहनत घेतली आहे. या कुलुपाची चावी चार फुटांची असून हे कुलूप १० फूट उंच, ४.५ फूट रुंद आणि ९.५ इंच जाडीचे आहे.

अमित शाह, जयंत पाटील भेटीच्या चर्चेवर अजितदादांचा मोठा खुलासा, म्हणाले…

‘इतका’ आला खर्च

सत्य प्रकाश शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना कुलूप तयार करण्यासाठी सुमारे २ लाख रुपये खर्च आला. यापूर्वी कोणीही असे कुलूप तयार केले नसल्यामुळे मंदिरासाठी मोठे कुलूप तयार करण्याचा विचार केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

भीषण अपघात! भरधाव कारची सहा गाड्यांना धडक; तिघांचा मृत्यू, सात गंभीर

- Advertisment -

ताज्या बातम्या