Thursday, January 8, 2026
Homeदेश विदेशSatyendra Das Passes Away: अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास...

Satyendra Das Passes Away: अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे निधन; वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अयोध्येतील राम मंदिरातील मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी लखनौ पीजीआय येथे अखेरचा श्वास घेतला. ३ फेब्रुवारी रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर आचार्य सत्येंद्र दास यांना गंभीर अवस्थेत लखनौ पीजीआयच्या न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनाने अयोध्येच्या मठ मंदिरांमध्ये शोककळा पसरली आहे.

आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य प्रदीप दास यांनी सांगितले की, दीर्घ आजारानंतर सकाळी आठ वाजेच्या सुमारास लखनऊच्या पीजीआयमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव पीजीआयमधून अयोध्येत आणले जात आहे. शिष्यांनी त्यांचे पार्थिव अयोध्येत नेले आहे. उद्या, १३ फेब्रुवारीला अयोध्येतील सरयू नदीच्या तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

सत्येंद्र दास यांनी सुमारे ३३ वर्षे राम मंदिराची सेवा केली. फेब्रुवारी १९९२ मध्ये, जेव्हा ‘वादग्रस्त जमिनी’मुळे रामजन्मभूमीची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे सोपवण्यात आली, तेव्हा जुने पुजारी महंत लालदास यांना काढून टाकण्याबाबत चर्चा सुरू झाली. दरम्यान, १ मार्च १९९२ रोजी सत्येंद्र दास यांची नियुक्ती भाजप खासदार विनय कटियार, विश्व हिंदू परिषद नेते आणि तत्कालीन विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांच्या संमतीने करण्यात आली.

YouTube video player

१९९२ मध्ये त्यांची राम मंदिरात नियुक्ती झाली तेव्हा त्यांना दरमहा १०० रुपये पगार मिळत होता. २०१८ पर्यंत सत्येंद्र दास यांचा पगार फक्त १२ हजार रुपये दरमहा होता. २०१९ मध्ये, अयोध्या आयुक्तांच्या सूचनेनुसार, त्यांचे वेतन १३,००० रुपये करण्यात आले. सत्येंद्र दास यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्यांनी १९७५ मध्ये संस्कृत विद्यालयातून आचार्य पदवी प्राप्त केली होती. यानंतर, १९७६ मध्ये, त्यांना अयोध्येतील संस्कृत महाविद्यालयात व्याकरण विभागात सहाय्यक शिक्षकाची नोकरी मिळाली.

राम मंदिर भवन निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्त आणि अयोध्या राजघराण्याचे नेते विमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा, डॉ. अनिल मिश्रा आणि गोपाल जी यांनीही सत्येंद्र दास यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महान रामभक्त, श्री रामजन्मभूमी मंदिर, अयोध्या धामचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र कुमार दास महाराज यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. सामाजिक आणि आध्यात्मिक जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याची आणि कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न...