Friday, April 25, 2025
Homeनगरआईवरुन शिवी दिल्यास 500 रुपयांचा दंड

आईवरुन शिवी दिल्यास 500 रुपयांचा दंड

शालेय विद्यार्थ्यांना मोबाईल निर्बंध || सौंदाळा ग्रामसभेत विविध ठराव मंजूर

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील सौंदाळा ग्रामसभेने आई व बहीणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घातली आहे. तरीही जो शिव्या देईल त्याच्यावर ग्रामपंचायतकडून 500 रुपये दंड सक्तीने आकारण्यात येईल, असे सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले.
सौंदाळाच्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. शिव्या देण्यावर बंदी घालून महिला भगिनींचा सन्मान करण्यात येत आहे, असे सरपंच शरद आरगडे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

यावेळी बालकामगार बंदीचा ठराव घेण्यात आला. बालकामगार मुक्त गाव करण्यासाठी बालकामगार दाखवा एक हजार रुपये मिळवा असे स्लोगन ठरवून बालकामगार निदर्शनास आल्यास त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडे आणून द्यावा त्या व्यक्तीस एक हजार रुपये बक्षीस दिले जाईल, असे ठरले. गावामध्ये बालविवाह शंभर टक्के बंदी करण्यात आलेले आहे. गावात कुणीही बालविवाह करू नये. केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही ग्रामसभेत ठरले. सोशल मीडियाच्या मोबाईलमुळे शालेय विद्यार्थी अभ्यास करत नसल्याचे निदर्शनास आल्याने यापुढे संध्याकाळी 7 ते 9 यावेळेत घरातील शालेय विद्यार्थ्याकडे मोबाईल द्यायचा नाही असाही ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. या सर्व ठरावांची सूचना सरपंच शरद आरगडे यांनी मांडली व अनुमोदन गणेश आरगडे यांनी दिले.

यावेळी उपसरपंच कोमल आरगडे, सदस्य मंगल ज्ञानदेव आरगडे, छाया मिनीनाथ आरगडे, भीमराज आढागळे, सुधीर आरगडे, बाळासाहेब आरगडे, चंद्रकांत आरगडे, मंजू आढागळे, माजी सरपंच प्रियंका आरगडे, उषा बोधक, मंगल बोधक, रंजना बोधक, अश्विनी आढागळे, कावेरी आढागळे, ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांसह पुरुष हजर होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...