Wednesday, March 26, 2025
Homeनाशिकसायाळे : धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

सायाळे : धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

सिन्नर । वार्ताहर Sinnar

तालुक्यातील सायाळे येथे गेल्या आठ दिवसांपासून रस्त्याने ये-जा करणार्‍या दुचाकीस्वारांवर हल्ला करणार्‍या बिबट्यास जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले. गुरुवारी (दि.23) रात्रीच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

- Advertisement -

सायाळे परिसरात नदीपात्रात जेमतेम असलेल्या पाण्यात वाढलेल्या गवतात एका बिबट्याने आठ दिवसांपासून मुक्काम ठोकला होता. हा बिबट्या बाजूच्या रस्त्याने जाणार्‍या येणार्‍या दुचाकीस्वारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करायचा. गवत मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याने तिकडे जाण्याची कोणी हिम्मत करत नव्हते. बिबट्याच्या दहशतीने दिवसा देखील त्या भागातून जाण्यास लोक घाबरत होते.

तीन दिवसांपूर्वी दुपारी व सायंकाळी असे दोन वेळा बिबट्याने दुचाकीस्वारांची पळता भुई थोडी केली होती. नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाने सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या शेजारी गवतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा ठेवला होता. रात्रीच्या सुमारास हा बिबट्या पिंजर्‍यात शिरला. त्याची पिंजर्‍यातून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू होती. पिंजरा हलत असल्याचे पाहून जवळच राहणार्‍या तरुणांनी विहिरीकडे धाव घेतली.

बिबट्या पिंजर्‍यात अडकल्याचे पाहून त्यांनी वनविभाग व वावी पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर नांदूरशिंगोटे वन परिमंडळ अधिकारी अनिल साळवे यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत तेथे धाव घेतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने पिंजरा मोकळ्या जागेत आणण्यात आला. त्यानंतर वनविभागाच्या विशेष वाहनाने बिबट्याची रवानगी मोहदरी येथील वनउद्यानात करण्यात आली आहे. हा बिबट्या साडेतीन वर्ष वयाचा असल्याची माहिती वनसेवकांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Santosh Deshumukh Case: “आडवे आले तर कायमचा धडा शिकवा”; संतोष देशमुख...

0
बीड | Beedसंतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणीला उपस्थित राहिले. उज्वल निकम हे...