Friday, May 17, 2024
Homeधुळेओबीसी म्हणत स्वत:ची जात जपताय, असे नको!

ओबीसी म्हणत स्वत:ची जात जपताय, असे नको!

धुळे Dhule । प्रतिनिधी

ओबीसींना (OBC) त्यांचे संविधानिक न्याय हक्क (Constitutional justice rights) मिळायलाच पाहिजे याबाबत दूमत असल्याचे कारण नाही पण ओबीसींच्या मुखट्याआड स्वत:चीच जात जपली (Jaat japali) जात असेल तर हेही योग्य नाही. खरे तर आता सगळ्या चळवळींनी एकत्र येवून बहुजनांच्या नेतृत्वाला (leadership of Bahujan) मोठे करण्याची गरज आहे. मात्र जातीयंताच्या लढाई (e battle of ethnicity) शिवाय हे शक्य नाही. असे परखड मत बारा बलुतेदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष (State President of Bara Balutedar Association ) कल्याणराव दळे (Kalyanrao Dale) यांनी मांडले.

- Advertisement -

धुळ्यात ओबीसींच्या हक्क अधिकारांसाठी आज तिसरी राज्यस्तरीय गोलमेल परिषद (State Level Roundtable Council) घेण्यात आली. धों. शा. गरुड वाचनालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडल आयोगाचे विश्लेशक (Mandal Commission Analyst) प्रा. श्रावण देवरे (Prof. Shravan Deore) हे होते.

मंचावर कोल्हापूरचे अनारकर तसेच गंगाधर माळी, अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष ए.के.भोई यांच्या उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा मनोगत अ‍ॅड. जगदीश सुर्यवंशी यांनी केले.

राज्यात ओबीसींच्या आरक्षणा (Reservations of OBCs) संदर्भात सर्वच राजकीय पक्ष (Political party) करीत असलेली दिशाभूल आणि इंपेरिअर डाटाच्या नावाखाली वेळकाडूपणा या संदर्भात अ‍ॅड. सुर्यवंशी यांनी आपली भूमिका मांडली. या गोलमेल परिषदेच्या माध्यमातून विचारांची सरमिसळ व्हावी आणि ओबीसी नेतृत्व (OBC leadership) बळकत होवून या समाजाला न्याय मिळावा यासाठीच ही परिषद घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले. आपल्या स्वतंत्र्य शैलीत आणि वेगवेगळे संदर्भ देत अ‍ॅड. राहूल वाघ यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

ओबीसी संदर्भातल्या कायद्याला धुळ्यातून अ‍ॅड. राहूल वाघ यांनी आव्हान देत याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हा कायदाच रद्द (Repeal the law) केला. हा धागा पकडून कार्यक्रमाचे प्रमुख वक्त कल्याणराव दळे म्हणाले, राज्यात 300 पेक्षा जास्त जाती आहेत. ओबीसींना हक्क (Rights to OBCs) मिळाले पाहिजे पण ओबीसींमध्येच छोट्या छोट्या जातींना न्याय मिळतो का? असा सवाल श्री. दळे यांनी उपस्थित करुन बारा बलुतेदारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.

ओबीसीही(OBCs) जात मोठी की आपली जात मोठी हे ठरवावे लागेल. ज्यांची पोटे भरली आहेत. ते समाजाची दिशाभूल (Misleading society) करण्याचा प्रयत्न करीत आहेत. वेगवेगळ्या चळवळींच्या माध्यमातून आम्हीच आमच्या जाती कवटाळून बसले आहेत. जातीअंताचा लढा देण्यासाठी सार्‍यांनी एकत्र येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. प्रा. देवरे यांनी ओबीसींच्या प्रश्नांची, आरक्षणाची अभ्यासपुर्ण मांडणी केली. यातल्या त्रृटी आणि बारकावे त्यांनी मांडलेत. कार्यक्रमाला उपस्थितांचे अ‍ॅड. विनोद सोनवणे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या