Saturday, January 24, 2026
HomeनगरAhilyanagar : अनुसूचित जमाती समिती घेणार आदिवासी योजनांची ‘झाडाझडती’

Ahilyanagar : अनुसूचित जमाती समिती घेणार आदिवासी योजनांची ‘झाडाझडती’

24 ते 26 सप्टेंबर दरम्यान जिल्हा दौरा || जिल्हा प्रशासन लागले कामाला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महाराष्ट्र विधानमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती 24 ते 26 सप्टेंबर दरम्यान जिल्हा दौर्‍यावर येत आहे. या दौर्‍यादरम्यान ही समिती जिल्ह्यात अनुसूचित जमातीसाठी (आदिवासी समाजासाठी) सरकारच्या वतीने राबविण्यात आलेले योजना, त्यांच्यासाठी मंजूर आणि खर्च करण्यात आलेल्या निधीचा हिशोब, यासह शासकीय भरतीमध्ये कर्मचार्‍यांच्या बढती, आरक्षण यामध्ये अनुसूचित जमातीच्या कर्मचारी- अधिकारी यांना न्याय दिलेला आहे की नाही, तसेच जिल्हा जात पडताळणी समितीचे काम योग्य प्रकारे झालेली आहे की नाही, याची खात्री करणार आहे. समितीच्या प्रस्तावित दौर्‍याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन सुरू करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान या समितीला वैधानिक महत्त्व असल्याने समितीच्या दौर्‍यादरम्यान नियोजनात कोणतीही कसर राहू नये, समितीच्या वतीने मागणी करण्यात आलेली सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात प्रशासन सध्या व्यस्त आहे. समितीच्या वतीने विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची माहितीची पाच प्रतीमध्ये दौर्‍यापूर्वीच समितीच्या सदस्यांना दहा दिवस आधी पोहोच करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात या पूर्वी अनुसूचित जमाती समितीच्या वतीने 2022-23, 2023-24 आणि 2024- 25 या कालावधीत जिल्हा दौरा करण्यात आलेला आहे.

YouTube video player

त्यादौर्‍यानूसार यंदा देखील समितीचे प्रमुख व सदस्य नगरला जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका यासह जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शहर व ग्रामीण, राज्य उत्पादन शुल्क, राज्य परिवहन महामंडळ विभाग नगर, प्रादेशिक परिवहन, विभाग पोलीस आयुक्त शहर पोलीस अधीक्षक ग्रामीण, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी राजुर या कार्यालयातील अनुसूचित जमाती अधिकारी-कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण यातील अनुशेष आणि जात पडताळणी विषयक बाबी, तसेच अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी राबविण्यात येणार्‍या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात आलेले आहेत की नाही याची पडताळणी करणार आहे.

तसेच सार्वजनिक बांधकाम, कृषी, जलसंधारण, पाटबंधारे आणि वन विभाग यांच्या सरळ सेवा व पदोन्नतीने भरण्यात येणार्‍या पदांमध्ये अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची विचार केलेला आहे की नाही याची तपासणी. शासनाच्या वतीने आदिवासी घटकांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना, यात वैयक्तिक व सामूहिक यांचा लाभ संबंधितांना दिलेला आहे की नाही याची पडताळणी व तपासणी करणार आहे. समितीच्या दौर्‍यादरम्यान नगरला जिल्ह्यातील महसूल, ग्रामविकास यासह अन्य शासकीय विभागाच्या अधिकार्‍यांची, आरोग्य व पुरवठा विभाग, क्रीडा विभाग या विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक समितीचे सदस्य तथा आमदार हे घेणार आहेत. यासह समितीचे सदस्य ऐनवेळी काही तालुक्यांचा दौरा करून थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या योजनांची पहाणीदेखील करणार आहेत.

समितीच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सर्व शासकीय विभागाचे प्रमुख यांना उपस्थित राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहेत. तसेच केंद्र व राज्य सरकारकडून मागील तीन वर्षात प्राप्त झालेल्या निधी त्यातून झालेला खर्च व प्रगती याची तपासणी समितीच्यावतीने करण्यात येणार आहे. या अनुसूचित जमाती समितीमध्ये समिती प्रमुखांसह 16 आमदार सदस्य असून समिती सोबत दौर्‍यादरम्यान विधानमंडळ सचिवायातील तीन अधीकारी, समिती प्रमुखांचे स्वीय सहाय्यक व चार कर्मचारी असे 11 व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

असे आहे समितीचे नियोजन
ही समिती बुधवार 24 सप्टेंबर रोजी सकाळी नगरच्या शासकीय विश्रामगृहावर एकत्र येणार असून त्यानंतर एक तास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या समवेत अनुसूचित जमाती कल्याणसाठी राबवण्यात येणार्‍या योजना व त्या राबवताना येणार्‍या अडचणी याबाबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत. दुपारी पोलीस विभागाशी निगडित विषयांवर अधिकार्‍यांशी चर्चा करणार असून त्यानंतर महावितरण महापालिका, राज्य उत्पादन शुल्क परिवहन मंडळ या विभागातील अधिकार्‍यांशी बैठक घेणार आहेत. दुपारी जिल्हा परिषदेशी विषयावर अधिकार्‍यांशी चर्चा करणार असून त्यानंतर सायंकाळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूरच्या अधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्रकल्प कार्यालय अंतर्गत येत असलेल्या तालुकानिहाय आदिवासी योजना शासकीय अनुदानित आश्रम शाळा वस्तीगृह शासनाचे व जिल्हा परिषदेच्या यंत्रणे कडून आदिवासी उपाय योजना क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या योजना यांचा दिवसभर आढावा घेणार आहे. तसेच शुक्रवार 25 रोजी ही समिती जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळा वस्तीगृह याठिकाणी भेटी देऊन त्या ठिकाणी झालेल्या विकास कामे असणार्‍या त्रुटी यांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. त्यानंतर दौर्‍यात समोर आलेल्या त्रुटी यावर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी गटविकास, अधिकारी सर्व शासकीय विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना सूचना करणार आहे.

हे आहे समितीचे सदस्य
या समितीत आ. दौलत दराडे शहापूर, आ. हरिश्चंद्र भोये विक्रमगड, आ. डॉ मिलिंद नरोटे गडचिरोली, आ. केवळराम काळे मेळघाट, आ. राजू तोडसाम अणी, आ. राजेश पाडवी शहादा, आ. शांताराम मोरे भिवंडी ग्रामीण, आ. मंजुळा गावित साक्री, आ. हिरामण खोसकर इगतपुरी, आ. आदित्य ठाकरे वरळी, आ. रामदास मसराम आरमोरी, आ. उमा खापरे पुणे, आ. इंद्रीस नाईकवाडी (राज्यपाल नियुक्त), आ.राजेश राठोड जालना, आ. सुनील शिंदे लोअर परेल, आ. विनोद निकोले डहाणू यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

Kamaal R Khan : अभिनेता कमाल खानला ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी;...

0
मुंबई | Mumbai अंधेरीतील ओशिवरामध्ये एका रहिवासी इमारतीवर रविवार (दि.१८) रोजी दोनदा बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर याप्रकरणी अभिनेता...