Wednesday, January 7, 2026
Homeनगरशिष्यवृत्ती परीक्षेत लोणीचा चौरे पहिला तर जामखेडचा हजारे राज्यात दुसरा

शिष्यवृत्ती परीक्षेत लोणीचा चौरे पहिला तर जामखेडचा हजारे राज्यात दुसरा

पाचवीचा 26.93 तर आठवीचा 15.18 टक्के निकाल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात नगर जिल्ह्यातील 37 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यात जिल्हा परिषदेचे 4, तर खासगी शाळांच्या 33 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पूर्व माध्यमिक आठवीमध्ये लोणी येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयाचा तनिष्क हेमंत चौरे हा राज्य गुणवत्ता यादीत पहिला आला आहे. पूर्व उच्च प्राथमिक पाचवीमध्ये हळगाव (ता. जामखेड) जिल्हा परिषदेचा विद्यार्थी शौर्य विकास हजारे राज्य गुणवत्ता यादीत ग्रामीणमधून द्वितीय आला आहे. दरम्यान, गेल्या सात वर्षांत यंदा सर्वाधिक 37 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

- Advertisement -

राज्य परीक्षा परिषदेतर्फे यंदा 18 फेब्रुवारी रोजी पूर्व उच्च प्राथमिक (5 वी) व पूर्व माध्यमिक (8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. त्याचा अंतिम निकाल 2 जुलै रोजी परिषदेने जाहीर केला. यात नगर जिल्ह्याचा पाचवीचा निकाल 26.93 टक्के, तर आठवीचा निकाल 15.18 टक्के लागला आहे. मागील वर्षी पाचवीचा निकाल 27.19 टक्के, तर आठवीचा निकाल 13.25 टक्के लागला होता. म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाचवीचा निकाल घसरला आहे, तर आठवीचा निकाल दोन टक्क्यांनी वाढला आहे. यंदा पाचवीची परीक्षा जिल्ह्यातून 31 हजार 911 विद्यार्थ्यांनी दिली. त्यातून 8 हजार 591 जण शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. याशिवाय आठवीची परीक्षा 23 हजार

आठवी – ग्रामीण व शहरी

तनिष्क चौरे, तेजस कुर्‍हे, सर्वेश नरसाळे, अथर्व जगताप, आदिती हुले, धीरज लाढाणे, कार्तिकी सोनवणे, आदित्य बुधवंत, निसर्ग बुचुडे, नतिक ब्राम्हणे, कौस्तूभ पन्हाळे, प्रज्वल सोमवंशी, आयुष मोरे, साईराज कडूस, ओम मिसाळ, अर्णव कवडे, अहिल तांबोळी, अथर्व पवार, अथर्व फटांगरे, दिशा देवकर, अनुष्का अकोलकर, जान्हवी खामकर.

YouTube video player

राज्य गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी
पाचवी -ग्रामीण : शौर्य विकास हजारे (जि.प.शाळा हळगाव, ता. जामखेड, राज्यात दुसरा), शौर्य ब्रम्हदेव खोसे (धर्मनाथ विद्यालय, जवळे, पारनेर- नववा), शौर्य हजारे (जि.प. शाळा सारोळा, जामखेड-चौदावा), अनिकेत काळे (जि.प. शाळा घाटशिरस, पाथर्डी- चौदावा). पाचवी (शहरी) : कृष्णा चन्ना (ऑक्झिलियम स्कूल- चौथा), आयुष टेकाळे (एस. के. सोमय्या विद्यालय, श्रीरामपूर, पाचवा), अनुप नांगरे (पारनेर पब्लिक स्कूल, पारनेर- आठवा), हर्ष पागिरे (एस. के. सोमय्या विद्यालय, श्रीरामपूर, नववा), अनन्या ठाकरे (एस. के. सोमय्या विद्यालय, श्रीरामपूर-अकरावी), अर्णव व्यवहारे (डायनामिक स्कूल, कर्जत- बारावा), इशान ठुबे (पारनेर पल्बिक स्कूल- 14 वा), कल्याणी घाडगे (भाऊसाहेब फिरोदिया, नगर- 17 वी), ऋतूपर्ण शिंदे (महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा- 18वा), श्रावण ढोरमले (डीबीएम स्कूल, पारनेर-सहावा), स्वयंम शिंदे (पोद्दार स्कूल, केडगाव- सातवा).

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....