Friday, May 3, 2024
Homeनगर4 हजार 2196 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

4 हजार 2196 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. यात मागील वर्षीपेक्षा निकालात सुधारणा झाली असून पाचवीचा निकाल 27.19 टक्के, तर आठवीचा निकाल 13.23 टक्के लागला आहे. यात पाचवी आणि आठवीचे मिळून 4 हजार 196 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र, दुसरीकडे 210 शाळांचा निकाल हा शुन्य टक्के लागला आहे.

- Advertisement -

यंदा शिष्यवृत्ती परीक्षा ऑगस्टमध्ये झाली. यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता पाचवी) जिल्ह्यातून 32 हजार 248 विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यातील 30 हजार 292 विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित, तर 895 विद्यार्थी अनुपस्थित होते. यातून झेडपीचे 4 हजार 93 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. हे प्रमाण 27.22 टक्के आहे. मागील वर्षी पाचवीचा निकाल केवळ 15.72 टक्के लागला होता. यात जवळपास दुप्पट वाढ होऊन यंदा निकाल 27.19 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

तर दुसरीकडे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता आठवी) जिल्ह्यातून 20 हजार 32 विद्यार्थी बसले होते. त्यातील 18 हजार 821 विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित, तर 1 हजार 211 विद्यार्थी अनुपस्थित होते. यापैकी 2 हजार 490 विद्यार्थीच शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. हे प्रमाण 13.23 टक्के एवढे आहे. यात झेडपीच्या शाळांच्या विद्यार्थ्यांची संख्या ही 1 608 होती. यातील 103 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत. दरम्यान, मागील वर्षी जिल्ह्यातील 490 शाळांचे निकाल शून्य टक्के लागले होते. यंदा निकाल सुधारल्याने शून्य टक्केवारीच्या शाळांची संख्या खाली असून यंदा 210 शाळांचा निकाल हा शून्य टक्के लागला आहे.

असे आहेत पात्र विद्यार्थी कंसात आठवी

अकोले 290 (शुन्य), संगमनेर 423 (5), कोपरगाव 896 (28), जामखेड 137 (1), पाथर्डी 184 (शुन्य), शेवगाव 238 (25), कर्जत 328 (7), पारनेर 256 (शुन्य), नेवासा 383 (4), श्रीरामपूर 217 (10), राहाता 163 (4), राहुरी 169 (12), श्रीगोंदा 222 (7), नगर 187 (शुन्य) असे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या