Saturday, July 27, 2024
Homeनगरठेचा-भाकरीची शिदोरी घेऊन शाळकरी मुलगा उद्धव ठाकरेंच्या भेटीला

ठेचा-भाकरीची शिदोरी घेऊन शाळकरी मुलगा उद्धव ठाकरेंच्या भेटीला

रांजणगाव देशमुख | वार्ताहर

उद्धव ठाकरे हे नगर दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे आज काकडी येथील दुष्काळी भागाची पाहाणी केली आणि शेतकऱ्यांकशी संवाध साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी धीर दिला. यावेळी एका शाळकरी मुलाने उद्धव ठाकरेंना ठेचा-भाकरी असलेली शिदोरी दिली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुलाची आस्थेने चौकशी करून हीच माझी आशीर्वादाची शिदोरी म्हणत मुलाला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

नेमकं काय घडलं?

उद्धव काकडी गावातील शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी रांजणगाव देशमुख येथील कार्तिक नवनाथ वर्पे हा शाळकरी मुलगा आला. त्यानं उद्धव ठाकरेंच्या हातात कापडात बांधलेली शिदोरी दिली. यात लोणचं, भाकर व ठेचा असल्याचं या मुलानं सांगितलं. तेव्हा अरे बाळा, तू माझ्यासाठी शिदोरी आणलीस, पण तू काही खाल्लंस का? तू जेवलास का? की स्वत: न जेवता मला शिदोरी देतोयस? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी या मुलाला केली. यावर आपण जेवल्याचं त्यानं सांगितलं. मी हे घेऊन जातो, मी खाईन हे, असं म्हणून उद्धव ठाकरेंनी ती शिदोरी ठेवून घेतली. दरम्यान, यांदर्भात माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हे प्रेम आहे त्यांचं. हीच आमची शिदोरी आहे. हेच आमचे आशीर्वाद आहेत. मला बोलण्यासाठी शब्द नाहीयेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी बोलताना म्हणाले, राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. दुबार पेरणी करूनही पिकं उगवली नाहीयेत. बियाणे-खतांचा खर्च वाया गेलेला आहे. सप्टेंबर उजाडला तरी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या हाती आता काहीच लागणार नाही. अशी सगळी परिस्थिती असताना सत्ताधारी ‘शासन आपल्या दारी’ नावाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात व्यस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुणी वाली उरलाय की नाही, अशी परिस्थिती आहे. पण शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. वेडंवाकडं पाऊल उचलू नये. मी फक्त आपल्याला आश्वासन द्यायला आलो नाही. मुंबईत जाऊन या सगळ्याचा मी पाठपुरावा करेन. शक्य तेवढी मदत मी आपल्याला मिळवून देईल, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी खचलेल्या शेतकऱ्यांना दिला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या