Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजधक्कादायक! रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या स्कुल बसला रेल्वेची जोरदार धडक; अनेक मुलांचा मृत्यू...

धक्कादायक! रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या स्कुल बसला रेल्वेची जोरदार धडक; अनेक मुलांचा मृत्यू झाल्याची भीती

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
तामिळनाडूतून अपघाताची एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. कडलूर जिल्ह्यामध्ये रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेनने स्कूल बसला जोरात धडक दिली. या अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्कूल बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर स्कूल बसची परिस्थीती पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फाटक नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात झाला. चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्रथामिक तपासातून समोर आले आहे. अपघातानंतर लोकांचा राग अनावर झाला असून मोर्चा काढण्यात आला. रेल्वे क्रॉसिंगवर सुरक्षा कमी असल्यामुळे हा अपघात झाल्याचा पालकांनी आरोप केला आहे. या घटनेचा तपास रेल्वे आणि स्थानिक पोलिसांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात शाळेची बस मुलांना घेऊन जात होती. रेल्वे ट्रॅक पार करत असताना ट्रेनची या बसला टक्कर बसली. या अपघातात स्कूल बसच्या चिंधड्या उडाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी भरलेली ही स्कूल बस उडून रेल्वे ट्रॅकच्या बाजुला असलेल्या झुडुपात पडली. या स्कूल बसचा व्हिडिओ पाहिला असता अपघाताच्या तीव्रतेची कल्पना येते.

YouTube video player

कडलूर जिल्ह्यातील चेम्मनकुप्पम परिसरात आज सकाळी हा भीषण अपघात झाला. वेगात असेल्या रेल्वेने स्कूल बसला जोरात धडक दिली. रेल्वे फाटक नसल्याने, त्यात सुरक्षा रक्षकही नव्हते, बस चालकाने निष्काळजीपणा दाखवत वेगात रेल्वे ट्रॅक पार करण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वेचा वेग जास्त होता, त्यामुळे हा अपघात असू शकतो, असे स्थानिकांनी सांगितलेय. या भयंकर अपघातामध्ये दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला असून १० मुले आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत, जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

रेल्वेने इतक्या जोरात धक्का दिला की स्कूल बस ५० ते ७० मीटरपर्यंत घसरत गेल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. रेल्वेची धडक इतकी जोरात होती की यात बसचा चक्काचूर झालय. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचावपथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातातील मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृताची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...