Saturday, July 27, 2024
Homeनगरशाळा कंत्राटीकरण परिपत्रकांची संगमनेरात होळी

शाळा कंत्राटीकरण परिपत्रकांची संगमनेरात होळी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

सरकारी शाळा बंदीचा निर्णय मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी छात्रभारती संघटनेच्यावतीने संगमनेर बस स्थानकासमोर शाळा कंत्राटीकरण परिपत्रकांची होळी करत सरकारचा निषेध नोंदविला. छात्र भारतीने केलेल्या आंदोलनामुळे रस्त्यावर जणू शाळाच भरली होती.

- Advertisement -

छात्र भारतीने शासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारी शाळा बंदीचा निर्णय मागे घ्या, शिक्षणाचे कंत्राटीकरण थांबवावे, राज्यातील सरकारी शाळा कंपन्यांना चालवायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, हा निर्णय गोरगरीब आदिवासी, शेतकर्‍यांच्या मुलांचे शिक्षण संपवणारा निर्णय आहे. यामध्ये जवळ पास 14000 पेक्षा जास्त शाळा बंद केल्या जाणार आहते. 65 हजार पेक्षा जास्त शाळा कंपन्यांना चालवायला देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. हा निर्णय धोकादायक आहे.

गरिबांना शिक्षण नाकारणारा आहे. शिक्षण देणे हे सरकारची जबाबदारी आहे. त्यापासून सरकारने हात काढून घेऊ नये. आरटीई कायदा असे सांगतो कि, एक किलोमीटर च्या आत शाळा असायला हवी, हा कायदा सरकार सरळ धुडकावून लावत आहे. कंपन्यांना शाळा चालवायला दिल्यावर मोठा फटका हा गरीब मुलांना बसणार आहे. आपण हा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी छात्रभारती संघटनेने केली आहे.

शासनाने निर्णय मागे न घेतल्यास छात्रभारती च्या वतीने महाराष्ट्र भर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी छात्रभारती अनिकेत घुले, टी डी एफ संघटनेचे हिरालाल पगडाल, राहुल जर्‍हाड, गणेश जोंधळे, ज्ञानेश्वरी सातपुते, वैष्णवी भोईर, सागर मोरे, सुहानी गुंजाळ, श्रावणी गायकवाड, वैष्णवी भोईर, विशाल मिसाळ, मकरंद जगताप, सुयश गाडे, प्रथमेश गाडे, नेहा काळे, रोशन राऊत, यश मुर्तडक, कावेरी आहेर, भरत सोनवणे, आशिष घुले, सोहम घुले, अनिकेत खरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या