Friday, January 23, 2026
HomeनगरAhilyanagar : काहींच्या चेहर्‍यावर हासू तर काहींच्या आसू !

Ahilyanagar : काहींच्या चेहर्‍यावर हासू तर काहींच्या आसू !

पहिल्याच दिवशी 54 हजार 526 विद्यार्थी ज्ञानमंदिरात दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सोमवारी सकाळी 10 वाजता जिल्हाभर वाजत-गाजत विद्यार्थी शाळेत दाखल झाली. यावेळी काहींच्या चेहर्‍यावर हासू तर काहींच्या चेहर्‍यावर आसूचे भाव दिसून आले. शिक्षण विभागाने मोठ्या धूमधडाक्यात जिल्हाभरातील ज्ञान मंदिरात शाळा प्रवेशोत्सव साजरा केला. या शाळा प्रवेशोत्सव 2025 कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत केले.

- Advertisement -

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखलपात्र 59 हजार 527 विद्यार्थ्यांपैकी 35 हजार 309 विद्यार्थी तर इतर व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये 19 हजार 217 शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी दाखल झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बुट, पायमोजे आदींचे वितरणही करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी मान्यवरांनी केलेल्या स्वागताने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी राहाता येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पारनेरच्या हंगा येथील शाळेमध्ये खा. निलेश लंके यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शेवगाव तालुक्यातील वरुर येथील शाळेत आ. मोनीका राजळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

YouTube video player

आ. किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यातील कातळापूर येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आ. अमोल खताळ यांनी संगमनेर येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आ. हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर व राहूरी येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आ. विठ्ठलराव लंघे यांनी नेवासा तालुक्यातील गेवराई येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आ. काशिनाथ दाते यांनी टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आ. विक्रम पाचपूते यांनी श्रीगोंदा येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

सनदी अधिकार्‍यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अहिल्यानगर तालुक्यातील निंबोडी येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी डॉ. आशिया यांच्या हस्ते इन्फोसिस स्प्रीनबोर्ड- मेकर लॅब ऑन व्हील्सफ या उपक्रमाचा शुभारंभही करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी भोरवाडी येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले तर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी बुर्‍हाणनगर येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळा प्रवेशोत्सवप्रसंगी जिल्हा परिषदेचे सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभागांचे विभागप्रमुख, तालुकास्तरावरील तहसिलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील वर्ग-1 व वर्ग-2 अधिकार्‍यांनी 304 शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नवागतांच्या स्वागतासाठी रांगोळी, वर्ग सजावट करण्यात आली होती. गावा-गावातून प्रभातफेर्‍यांचे आयोजन करण्यात आले होते. पहिले पाऊल उपक्रमांतर्ग इयत्ता 1 लीच्या विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन पालकांना त्यांची प्रतही देण्यात आली. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्‍यांनी समारंभपूर्वक केलेल्या स्वागतामुळे सर्व विद्यार्थी आणि पालक भारावून गेले होते. या स्वागतामुळे त्यांच्या चेहर्‍यावर आनंद व समाधानाचे भाव स्पष्ट दिसत होते.

ताज्या बातम्या

अत्याचार

त्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर...

0
बदलापूर | Badlapurबदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये हे कृत्य...