Monday, January 26, 2026
HomeनगरParner : सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना विषबाधा; सुप्यात घेतले उपचार

Parner : सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना विषबाधा; सुप्यात घेतले उपचार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

छत्रपती संभाजीनगर येथील रांजणगाव (ता. गंगापूर) येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाची सहल कोकण दर्शनासाठी गेली होती. दरम्यान, रात्री रायगड येथे जेवण करून परतीचा प्रवास करत असताना, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांना मळमळ, जुलाब व उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्या तीस विद्यार्थी व दोन शिक्षकांना सुपे (ता. पारनेर) येथील निरामय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. आज (ता. 19) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास त्यांना उपचारानंतर सोडण्यात आले.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाची सहल कोकण दर्शनासाठी गेली होती. गुरुवारी (दि. 18) रायगड येथील हॉटेल समर्थ येथे त्यांनी मुक्काम केला व सकाळी रायगड सर केला. त्यानंतर दुपारी खाली आल्यावर हॉटेल समर्थ येथे जेवण करून ते परतीच्या प्रवासाला निघाले असता, त्यातील काही विद्यार्थी व शिक्षकांना वाटेत त्रास होऊ लागला. काहींना पोटात दुखणे, मळमळ होणे, चक्कर येणे तर काहींना उलटी व जुलाब याचा त्रास होऊ लागला.

YouTube video player

परतीच्या प्रवासात ते पारनेर तालुक्यातील सुपे येथे आल्यानंतर चालक महेश उगले यांनी प्रसंगावधान साधत गाडी निरामय हॉस्पिटल येथे आणली आणि त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दवाखान्यात भरती केले. यावेळी तीस विद्यार्थी व दोन शिक्षकांना त्रास होत होता. त्यापैकी एक विद्यार्थिनी व एक शिक्षक यांना अतिदक्षता विभागात सुद्धा ठेवण्यात आले होते. रात्रभर पाच ते सहा डॉक्टर व इतर स्टाफ अशा 25 ते 30 कर्मचार्‍यांनी रात्रभर या विद्यार्थ्यांवर उपचार केले. शुक्रवारी दुपारनंतर ते विद्यार्थी बरे झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस निरीक्षक शिळीमकर व उपायुक्त कराड यांना ‘राष्ट्रपती पदक’

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri राहुरी तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना त्यांच्या...