Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशइस्रोला मिळाले नवीन प्रमुख, जाणून घ्या कोण आहेत एस.सोमनाथ

इस्रोला मिळाले नवीन प्रमुख, जाणून घ्या कोण आहेत एस.सोमनाथ

विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) चे संचालक आणि इस्रोचे प्रमुख शास्त्रज्ञ एस. सोमनाथ (S Somanath) यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) नवीन प्रमुख बनवण्यात आले आहे. एस. सोमनाथ (S Somanath)हे देशातील सर्वोत्तम रॉकेट तंत्रज्ञ आणि एरोस्पेस अभियंता आहेत. विद्यामान प्रमुख के.सीवन (K Sivan)यांचा कार्यकाळ 14 जानेवारीला पुर्ण होत आहे.

बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

- Advertisement -

इस्रोच्या रॉकेटच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. सोमनाथ लाँच व्हेईकल डिझाईन करण्यात मास्टर आहे. लाँच व्हेईकल सिस्टीम इंजिनीअरिंग, स्ट्रक्चरल डिझाईन, स्ट्रक्चरल डायनॅमिक्स आणि पायरोटेक्निक्समध्ये ते तज्ञ आहेत. ISRO प्रमुख होण्यापूर्वी ते GSAT-MK11 (F09) अपग्रेड करण्यात गुंतले होते. जेणेकरून अवजड दळणवळण उपग्रह अवकाशात सोडता येतील. याशिवाय एस. सोमनाथ हे GSAT-6A आणि PSLV-C41 मध्ये सुधारणा करण्यात गुंतले होते जेणेकरून रिमोट सेन्सिंग उपग्रह योग्यरित्या प्रक्षेपित करता येतील.

केरळमधील तिसरे प्रमुख

सोमनाथ 1985 मध्ये इस्रोमध्ये दाखल झाले. त्यांनी प्रक्षेपण वाहनांच्या डिझाइनमध्ये मोठे योगदान दिले आहे. केरळचे शास्त्रज्ञ जी माधवन नायर आणि डॉ के राधाकृष्णन यांनी 2003 ते 2014 या कालावधीत अंतराळ संस्थेचे नेतृत्व केले. त्यानंतर सोमनाथ या शीर्षस्थानी पोहोचणारे तिसरे मल्याळी शास्रज्ञ आहेत.

रेल्वेचा प्रवास महागणार, वाचा कोणाला किती जास्त मोजावे लागणार पैसे

अशी आहे वाटचाल

सोमनाथ यांनी एर्नाकुलम येथील महाराजा कॉलेजमधून शिक्षण घेतले. केरळ विद्यापीठाच्या टीकेएम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

1985 मध्ये ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये दाखल झाले. सुरुवातीच्या टप्प्यात ते पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) प्रकल्पाशी संबंधित होते. ते VSSC चे सहयोगी संचालक (प्रकल्प) बनले आणि 2010 मध्ये GSLV Mk-III लाँच व्हेईकलचे प्रकल्प संचालक देखील झाले. नोव्हेंबर 2014 पर्यंत ते प्रोपल्शन आणि स्पेस ऑर्डिनन्स एंटिटीचे उपसंचालक होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या