Tuesday, May 7, 2024
Homeदेश विदेशSCO Foreign Minister's Meet : दहशतवाद पूर्णपणे संपायला हवा; शांघाय सहकार्य परिषदेत...

SCO Foreign Minister’s Meet : दहशतवाद पूर्णपणे संपायला हवा; शांघाय सहकार्य परिषदेत भारताची भूमिका

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

यंदा होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषदचे (SCO Meeting) अध्यक्षपद भारत भूषवणार असून ही बैठक आजपासून (5 मे) रोजी सुरु झाली आहे. ही परिषद गोव्यात (Goa) आयोजित करण्यात आली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S.Jaishankar) यांनी सर्व सहयोगी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचे स्वागत केले. आजच्या या बैठकीत जुलैमध्ये होणाऱ्या बैठकीतील अजेंडा निश्चित करण्यात येणार आहे. गोव्यातील बेनौलिम येथे ही परिषद होत आहे.

- Advertisement -

दरम्यान, या बैठकीसाठी पाकिस्तानच्या उच्चपदस्थ नेत्याने भारताला भेट देण्याची २०११ नंतर ही प्रथमच वेळ आहे. तब्बल १२ वर्षांनंतर पाकिस्तानी मंत्री भारतात दाखल झाले आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो (Bilwal Jhardari Bhutto) यांच्याशी हस्तांदोलन न करता लांबूनच त्यांना नमस्कार केला.

….अन् राज ठाकरेंनी रेखाटलं अजितदादांचं व्यंगचित्र; म्हणाले, “झालं ते गोड माना…”

दरम्यान, दहशतवादाच्या मुद्दय़ावरून दोन्ही देशांमधील संबंध ताणलेले असताना भुट्टो भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत पाकिस्तानातील वाद उघड आहेत. या दोन्ही देशातील नेते एकमेकांशी हस्तांदोलन टाळल्याचे यावेळी बघायला मिळाले. या देशांमध्ये उघड-उघड चर्चाही होत नाही. मात्र एससीओचे सदस्य या नात्याने या दोन्ही देशातील परराष्ट्रमंत्री एका व्यासपीठावर आले.

या परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादावर देखील चर्चा केली. तसेच दहशतवादाला कोणत्याही पद्धतीचे समर्थन दिले जाऊ शकत नाही अशी भूमिका पराराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मांडली. तसेच दहशतवाद पूर्णपणे संपायला हवा, असे मत देखील मांडले. त्याचप्रमाणे दहशतवादाला कोणत्याही प्रकारचे साहाय्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करायला हवी असे देखील एस.जयशंकर यांनी म्हटलं आहे.

मी सर्वात मोठा जुगारी, मला अटक करा… शेतकऱ्याची अजब मागणी, नेमकं प्रकरण काय?

‘दहशतवादाविरुद्ध लढणे हे एससीओ स्थापन करण्यामागील महत्त्वाचे कारण आहे’, असे देखील एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. तसेच या परिषदेसाठी चीनचे परराष्ट्र मंत्री किंग गँग, रशियाचे सर्गेई लॅवरॉन तसेच पाकिस्तानचे परारष्ट्रमंत्री बिलावल भूट्टो हे देखील उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या