Tuesday, March 25, 2025
Homeनगरमाध्यमिक शिक्षक सोसायटीच्या दोन संचालकांना अखेर डच्चू

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या दोन संचालकांना अखेर डच्चू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीमधील दोन संचालकांचे सभासदत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी काढले आहेत. संस्थेचे संचालक धोंडीबा खंडू राक्षे व काकासाहेब मुरलीधर घुले हे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले असताना देखील सोसायटीत संचालक म्हणून कार्यरत होते. विरोधी संचलकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीवरून त्यांचे संचालक व सभासदत्व रद्द करण्यात आले आहे.

- Advertisement -

या सेवानिवृत्त शिक्षकांच्या विषयावर नुकत्याच झालेल्या शिक्षक सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला होता. त्यानंतर देखील सत्ताधारी मंडळाकडून कोणतीच हालचाल झाली नव्हती. अखेर विरोधी संचालकांनी सहकार खात्याकडे तक्रार केल्यानंतर सहकार खात्याने या सेवानिवृत्त संचालक यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारत त्यांचा कारभार थांबवला आहे. माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक राक्षे हे 31 मे 2023 रोजी व घुले हे 31 मे 2024 रोजी निवृत्त झालेले होते. संस्थेच्या घटनेच्या उपविधीनुसार ज्या दिवशी शिक्षक निवृत्त होतो, त्याच दिवशी त्याचे सभासद व रद्द होत असते. परंतु या दोन्ही संचालकांनी अजूनही संचालकपद कायम ठेवलेले होते.

यावरून विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे व वसंत खेडकर या संचालकांनी त्यांच्या विरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार करून, सेवानिवृत्त झालेले दोन्ही संचालक संस्थेच्या घटनेचे उल्लंघन करून संचालक पदाचा दुरूपयोग करत असल्याचा आरोप केला होता. तर संस्थेच्या घटनेनुसार दोन्ही संचालकांचे सभासदत्व व संचालक पद रद्द करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील तसेच संस्थेच्या मंजूर उपविधीतील तरतुदीस अनुसरून राक्षे व घुले यांचे सभासदत्व संपुष्टात येत असल्याचे जिल्हा उपनिबंधक यांनी पत्रात म्हटले आहे. तर याबाबत कार्यवाही करण्याचे लेखी पत्र सोसायटीचे चेअरमन व व्यवस्थापकांना काढले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...