Friday, September 20, 2024
Homeनाशिकनाशिक कृउबा समितीचे तत्कालीन बडतर्फ सचिव अरूण काळे यांना अटक

नाशिक कृउबा समितीचे तत्कालीन बडतर्फ सचिव अरूण काळे यांना अटक

नेमकं प्रकरण काय?

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

- Advertisement -

बनावट पुस्तक छापून नाशिक बाजार समितीची (Nashik APMC) फसवणूक (Fraud) करून फी वसुलीच्या नव्वद लाखाचा रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी बडतर्फ केलेल्या बाजार समिती कर्मचाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अधिक तपासात तत्कालीन सचिव संशयित अरूण काळे (Arun Kale) यांनी तपास कामात योग्य सहकार्य न करणे, न्यायालयात वेळेत हजर न राहणे, आवश्यक कागदपत्र सादर न केल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पडोळकर करीत आहेत.

हे देखील वाचा : आता वर्षाला ३ घरगुती गॅस सिलेंडर मोफत; ‘या’ महिलांना मिळणार लाभ

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित सुनील जाधव नामक व्यक्ती बाजार समितीत लिपिक (प्रतवारी कर ) या पदावर कार्यरत होता. १ डिसेंबर ते २४ मे २०२२ पर्यंत संशयित सुनील जाधव यांची जकात नाका मार्केट फि वसुली करीता देण्यात नेमणूक करण्यात आली होती. या दरम्यान बाजार फी वसुलीच्या काही रक्कमेचा भरणा त्यांनी बाजार समितीत केला होता. पावती पुस्तक क्रमांक ७५, ८७, ३०१, ३२३, ३६५, ३६६, ३८९, ४३५, ४४२, ४६९, ५२९ हे पावती पुस्तक संशयित जाधव यांना देण्यात आले होते. मात्र, संशयित जाधव यांनी बाजार फी वसुलीसाठी दिलेल्या या पावती पुस्तकाचा वापर केला नाही. परंतु याच क्रमांकांचे बनावट पावती पुस्तक बनवून बाजार फी वसुली केली आणि बाजार समितीने दिलेले पावती पुस्तक कार्यालयात जमा करीत पावत्याच फाडल्या नाही असे सांगितले.

हे देखील वाचा : Kerala Wayanad Landslide : भूस्खलनातील मृतांची संख्या ९३ वर; १२८ जखमी, अनेकजण अडकल्याची भिती

तसेच पावती पुस्तक क्रमांक ३०९ सुनिल विश्वनाथ जाधव यांना दिले नसतांना त्या माध्यमातुन बाजार फीची वसुली केली. बाजार समितीच्या एकुण १२ पावती पुस्तकांचा गैरवापर करून पावती पुस्तकांमध्ये खाडाखोड करून कृषी बाजार समिती नाशिक (Nashik) या संस्थेच्या दप्तरात फेरफार करून त्याव्दारे एकुण रक्कम रूपये एकोणनव्वद लाख सत्याहत्तर हजार दोनशे रुपयांचा अपहार करून कृषी बाजार समितीची फसवणुक व विश्वासघात केला. या प्रकरणी नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती सचिव प्रकाश घोलप यांनी सुनील जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. संशयित सुनील जाधव यांनी प्रथम नाशिक न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला मात्र, तो न्यायालयाने फेटाळला होता.

हे देखील वाचा : मराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले…

त्यावेळी जाधव यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली, या प्रक्रियेत उच्च न्यायालयाने काही निरीक्षण नोंदविले. यात दोन वर्षांनी गुन्हा का नोंदविण्यात आला, विभागीय कारवाईत सेवा समाप्ती करण्यात आली. विलंब कारण हे प्रशासक असल्यामुळे झाल्याचे नमूद केले गेले. या गुन्ह्यात तत्कालीन सचिव संशयित अरूण काळे यांनी पोलिसांना तपास कामात सहकार्य केल नाही. तसेच न्यायालयात तारखेस वेळीच हजर राहणे, न्यायालयात मागितलेले कागदपत्र सादर न करणे. वेळोवेळी आदेश देऊन देखील त्याचे पालन न करणे या कारणाहून न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवार (दि.३०) रोजी सायंकाळी तत्कालीन सचिव अरूण काळे यांना ताब्यात घेण्यात आले.

हे देखील वाचा : हावडा-मुंबई एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी

प्रशासकीय कार्यकाळामुळे उशिरा गुन्हा दाखल

नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीत जवळपास एक वर्ष प्रशासकीय अधिकारी कामकाज बघत होते. त्यावेळी प्रशासकीय अधिकारी यांच्यावर अतिरिक्त कारभार देखील होता. प्रशासकानंतर मुख्य हे सचिव होते. याच काळात संशयित सुनील जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करणे बाबत ठराव देखील झाला होता. मात्र याकडे बडतर्फ तत्कालीन सचिव अरूण काळे यांनी दुर्लक्ष केले. ही बाब काळे यांना त्रासदायक ठरली असल्याच बोलल जात आहे. तसेच न्यायालयाने याबाबत निरीक्षण देखील नोंदविले आहे. तसेच अधिक तपासात यात अजूनही काही बाजार समिती कर्मचाऱ्यांचा सहभाग उघड होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत काळेंना संपर्क केला असता त्यांचा मोबाईल आऊट ऑफ कव्हरेज एरिया आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या