Tuesday, May 21, 2024
Homeनाशिकविकासाच्या निकषावर विश्वस्त मंडळाची निवड

विकासाच्या निकषावर विश्वस्त मंडळाची निवड

सातपूर । प्रतिनिधी Satpur

निमाच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीसाठी ( election of the Board of Trustees of NIMA )सह आयुक्तांनी मागवलेल्या अर्जासोबत त्या सभासदाचे संस्थेसाठीचे योगदान, इतर संस्थातील योगदान, सामाजिक कार्य याबद्दल माहिती मागवली आहे

- Advertisement -

नेमणूक पूर्णपणे गुणवत्ता (मेरिट) आणि पारदर्शीपणे होणार आहे. सभासदांपैकी जे कोण इच्छुक असतील त्यांची निवड ते कोणाच्या गटाचे आहेत यापेक्षा त्यांचा संस्थेला उपयोग किती या निकषांवर होणार आहे. ज्यांना वाटेल की, आपण संस्थेला उपयोग होईल त्यांनी जरूर अर्ज दाखल करावेत. जर एखाद्याची निवड काही कारणाने झाली नाही, तर त्यात अपमान वाटण्यासारखे काही नाही, ही काही निवडणूक नाही. अशी भूमिका निमाचे माजी अध्यक्ष व कार्य समितीने निवडलेल्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष विवेक गोगटे ( Vikas Gogte )यांनी व्यक्त केली.

दरम्यान विद्यमान पदाधिकार्‍यांनी मात्र प्रवेशद्वारावर डझनांनी बाउन्सर ठेवून गंभीर चूक केली आहे. त्यामुळेच विषयाला वेगळे वळण मिळाले. कायदेशीर मार्गाने प्रयत्न करतांना न्यायालयात पण जावे लागते.

विशेष कार्यकारी समितीने ते केले यात कोणतीही चूक नाही. न्यायालयात प्रकरण नेऊन संस्थेची बदनामी केली असे म्हणणे म्हणजे एक प्रकारे न्यायालयाचा अपमान ठरतो. या सर्व घटनाक्रमात संस्थे बाबत मा. उपआयुक्त यांनी त्यांच्या समोर आलेल्या व दप्तरी दाखल कागद पत्रानुसार जो निर्णय दिला त्याप्रमाणे संस्थेवर प्रशासकांची नियुक्ती झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या