नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar
शहादा तालुक्यातील बिलाडी त.सा. येथील भुमिपूत्र तथा धुळे पोलीस दलातील पोलीस नाईक जगदिश पाटील यांची परराष्ट्र मंत्रालयालतर्फे भारतीय दुतावासात निवड झाली आहे.
धुळे पोलीस दलातील पोलीस नाईक जगदिश पाटील बिलाडी येथील रहिवासी आहेत. त्यांची भारतीय दुतावासात निवड झाल्याने गुर्जर समाजातून अभिनंदन होत आहे. भारतातील पोलीस व निमलष्करी दल यांच्यामधून मुंबई व दिल्ली येथील निवड प्रक्रियेतून अतिशय कठीण पातळीवर आधारीत इंग्रजी भाषेतील संभाषण कौशल्य व ज्ञान, कॉम्प्युटर ज्ञान सेक्युरिटी बेसीक्स तसेच विविध विषयांवर आधारीत परीक्षेद्वारे व आपत्तीजनक परिस्थितीत तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता, बुध्दी कोशल्य, खेळाडू वृत्ती, समर्पक भावना व 20 वर्षातील पोलीस दलातील सेवेत त्यांनी मिळालेले मेडल्स, बक्षिसे व प्राविण्य या आधारावर ही निवड करण्यात आली. जगातील 178 देशांमध्ये असलेल्या भारतीय राजदूतावासामध्ये तीन वर्षासाठी परदेशात पाटील यांची नियुक्ती होणार आहे. जगदिश पाटील यांचे धुळे पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे, एलसीबी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.