नाशिक | प्रतिनिधी | Nashik
स्व.आर.आर (आबा) पाटील तालुका सुंंदर गाव पुरस्कारासार्ठी (Taluka Beautiful Village Award) 15 गावांंची निवड झाली असुन
येत्या शुक्रवारी (ता.17) पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांच्या हस्ते या गांवाना प्रत्येकी दहा दहा लाखाचा पुरस्कार (Award) दिला जाणार आहे. अशी माहीती मुख्य कार्यकारी अधीकारी अशीमा मित्तल (Chief Executive Officer Ashima Mittal) यांनी दिली.
दर वर्षी सोळा फेब्रुवारीला आर आर. पाटील यांंच्या स्मरनार्थ सुंदर गावांना हा पुरस्कार दिला जातो. एकदा पुरस्कार मिळाल्यानंंतर पाच वर्षांनीच पुन्हा पुरस्कार मिळतो. जी गावे सुंंदर आहेत. ज्यांनी स्वच्छ भारत अभीयान (Swachh Bharat Abhiyan) यशस्वी राबवीले. पारदर्शी कारभार केला. नवनवीन योजना राबवुन गावाला प्रगतीपथावर नेले. अशा गावांची यासाठी निवड केली जाते.
‘या’ गावांना मिळणार पुरस्कार
वडांंगळी (सिन्नर), वेळुंजे (त्रंबक), शिरसाठे (इगतपुरी), थेरगाव (निफाड), सुळ (कळवण), बोरोळे (नांंदगाव), राजदेरवाडी (चांदवड), दरी (नाशिक), भारदेनगर (मालेगाव), कोपुली (पेठ), महालखेडा (येवला), पिंपळदर (बागलान), करंजंवन (दिंडोरेी), वरवंंडी (देवळा), बुबळी (सुरगाणा) या गावांची निवड झाली आहे.
खेडगाव व शिरसाटे या दोन गावांची निवड जिल्हस्तरीय पुरस्कारासाठीही झाली असल्याने त्यांना प्रत्येकी 20 – 20 लाखाचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. असे मित्तल, अतीरीक्त मुख्य कार्यकारी अधीकारी अर्जुऩ गुंंडे, उपमुख्य कार्यकारी अधीकारी प्रवीणसिंंह परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधीकारी महेश बच्छाव, शिक्षणाधीकारी कोळी यांंनी स्पष्ट केले. शुक्रवारी सकाळी आकराला रावसाहेब थोरात सभागृहात सरपचं यांंना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.





