Friday, April 25, 2025
Homeक्राईममजूर श्रमिक संघाच्या उपाध्यक्षाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मजूर श्रमिक संघाच्या उपाध्यक्षाचा आत्मदहनाचा प्रयत्न

पिंगळवाडे | वार्ताहर
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ताहराबाद वन परिक्षेत्राच्या कार्यालया बाहेर वन मजूर श्रमिक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र काळू साळुंखे राहणार शिरपूरवडे ता.बागलाण यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. यात ते ८०% भाजले गेले आहेत. त्यांना तात्काळ नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रीपुवडे येथील संतप्त नागरिकांनी ताहराबाद वनपरिक्षेत्र कार्यालय येथे धाव घेत साळुंखे यांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. तसेच वनपाल सागर पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. साळुंखे यांच्या आत्मदहनास कोणी प्रवृत्त केले याबाबत चौकशी केली असता सागर पाटील नामक वनपाल यांचे नाव समोर आले. सागर पाटील आणि राजेंद्र साळुंखे यांच्यात असलेल्या आपसातील वादामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा घटनास्थळी होत होती.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...