Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा मृत्यू; घरातील विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा मृत्यू; घरातील विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

मुंबई | Mumbai

ज्येष्ठ पत्रकार (Senior journalist) अरुण फणशीकर (वय ७२) (Arun Phanshikar) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. घरातील विहिरीत फणशीकर यांचा मृतदेह (Dead Body) पोटाला दगड बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ही आत्महत्या (Suicide) आहे की घातपात? यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहे….

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, फणशीकर हे आज सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले होते. मात्र ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात (Sitabardi Police Station) बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, मात्र त्यात ते दिसत नव्हते.

भाजपचे मिशन २०२४ : मतदारसंघ निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या; नाशिक, दिंडोरीसाठी ‘यांना’ संधी

यानंतर पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेतली. त्यावेळी शोध घेत असताना घरासमोरील विहिरीजवळ (Well) श्वानपथक थांबले. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली असता त्यांना फणशीकर यांचा मृतदेह त्यांच्या घरातील विहिरीत आढळून आला. यावेळी त्यांचा मृतदेह एका स्कार्फच्या कापडामध्ये बांधला होता असे पोलिसांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Nashik Accident News : कंटेनरच्या धडकेत दोन जैन साध्वींचा मृत्यू

अरुण फणशीकर यांचे पत्रकारिता क्षेत्रातील योगदान

फणशीकर यांनी नागपूरच्या हितवाद या इंग्रजी दैनिकातून पत्रकारितेची सुरुवात केली. इंडियन एक्सप्रेसच्या नागपूर आवृत्तीचे ते मुख्य वार्ताहर होते. यासोबतच त्यांनी हिंदुस्तान टाइम्समध्येही काम केले आहे. दिवंगत पत्रकारांनी अनेक वर्षे जनसंवाद विभागात शिक्षक म्हणूनही काम केले होते.

Nashik : माजी सैनिकाचा प्रामाणिकपणा; तब्बल एक लाखाचा धनादेश केला परत

- Advertisment -

ताज्या बातम्या