Tuesday, March 25, 2025
Homeराजकीयभाजपला धक्का! विदर्भातील माजी आमदाराचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, हाती बांधलं शिवबंधन

भाजपला धक्का! विदर्भातील माजी आमदाराचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, हाती बांधलं शिवबंधन

मुंबई । Mumbai

विधानसभा निवडणुकीला आता खूप कमी कालावधी राहिला आहे. येत्या ३० ते ४० दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू शकते, अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या माजी आमदाराने पुन्हा घरवापसी केली आहे. त्यामुळे, गोंदियातील विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.

- Advertisement -

शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी अखेर शिवसेना पक्षात घरवापसी केली आहे. २०१९ मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता सहा वर्षानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करुन घरवापसी केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश झाला.

हे ही वाचा : पवार, ठाकरे, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी; जरांगेंचे पहिल्यांदाच विरोधकांना…

दरम्यान, ठाकरे गटात प्रवेश केल्यावर रमेश कुथे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान जिव्हारी लागलं आणि त्यामुळेच आपण पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मला भाजपने बेवकूफ बनवल्याची घणाघाती टीकाही कुथे यांनी यावेळी केली. ते मीडियाशी संवाद साधत होते.

फेब्रुवारी २०२४ मध्ये चंद्रशेखर बावनकुळे नागपूरला आले होते. आपल्याकडे येणाऱ्यांची खूप मोठी लाईन आहे, असं त्यांनी मला सांगितलं होतं. १०० जण आपल्याकडे येतील आणि पाच जण जातील. त्याने आपल्याला फरक पडत नाही. त्याच दिवशी कळलं की भाजपने आपल्याला बेवकूफ बनवलं, असं रमेश कुथे म्हणाले.

हे ही वाचा : जयंत पाटील थेट अजितदादांच्या आमदाराच्या घरी; बंद दाराआड काय चर्चा झाली?

मी आधी शिवसेनेत होतो आणि पुन्हा एकदा शिवसेनेत आलो आहे. २०१९ मध्ये मी भाजपला विधानसभेचे तिकीट मागितलं होतं. मला त्यांनी तिकीट दिलं नाही. त्यानंतर मी जिल्हा परिषद सभापतीसाठी माझ्या मुलाचं नाव समोर केलं होतं. तेव्हा सुद्धा त्यांनी मुलाला तिकीट नाकारलं. त्यानंतर माझा मुलगा अपक्ष म्हणून उभा राहिला आणि सभापती झाला. आता सुद्धा मला ते तिकीट देणार नव्हते. त्यामुळे इथे राहून उपयोग नव्हता, असं रमेश कुथे म्हणाले.

दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला सपाटून पराभव पत्करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर रमेश कुथे मातोश्रीवर शिवबंधन बांधून घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपली उमेदवारी पक्की करतील असं म्हटलं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत गोंदिया विधानसभा मतदारसंघातून रमेश कुथे हे निवडणुकीला सामोरे जातील, असं पण म्हटलं जात आहे.

हे ही वाचा : ‘लाडकी बहीण योजना’ अडचणीत; अर्थ विभागाने केली चिंता व्यक्त

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...