Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' प्रदान

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान

दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi

- Advertisement -

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण 2024’ हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान नोएडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदान केला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार,एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार उपस्थित होते.

YouTube video player

शिल्पकार सुतार यांनी आपल्या अद्वितीय शिल्पकलेने महाराष्ट्राची प्रतिमा देश-विदेशात उज्ज्वल केली आहे.शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी यांचे विचार त्यांनी पाषाणातून साकार केले. स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि चैत्यभूमीवरील स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी ही त्यांची उल्लेखनीय निर्मिती आहेत.

शिल्पकार राम सुतार यांनी हा पुरस्कार आपल्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान असल्याचे सांगितले. त्यांची सर्जनशीलता शंभर वर्षांनंतरही ताजीतवानी असून त्यांचा वारसा शिल्पकार अनिल सुतार पुढे नेत आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Crime News : महाराष्ट्र हादरला! सरपंच होण्याच्या हव्यासापोटी नराधम बापाने पोटच्या...

0
नांदेड । Nanded राजकारणाची हाव आणि सत्तेची लालसा माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचा एक अत्यंत सुन्न करणारा प्रकार नांदेड जिल्ह्यात समोर आला आहे. ग्रामपंचायतीच्या...