Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशशेअर बाजारात ब्लॅक मन्डे : सेन्सेक्स 1600 अंकांनी कोसळला : काय आहे...

शेअर बाजारात ब्लॅक मन्डे : सेन्सेक्स 1600 अंकांनी कोसळला : काय आहे कारण?

शेअर बाजारातील (Sensex down)गुंतवणुकदारांसाठी आजचा दिवस निराशाजनक असल्याचे चित्र आहे. दुपारी 1.00 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला. दुपारी 2 वाजेच्या सुमारास 1600 अंकांनी सेन्सेक्समध्ये घसरण झाली. तसेच निफ्टीतही घसरण दिसून आली. जागतिक बाजारात सुरू असलेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही (Sensex down)झाला असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स 250 अंकांनी घसरला. ही घसरण दुपारच्या सत्रातही कायम राहिली.

मालेगावच्या युवकाच्या उद्योगात ‘लेन्सकार्ट’चे सीईओ झाले भागिदार

- Advertisement -

सोमवारी प्री-ओपन सत्रापासूनच शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 250 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टीमध्ये 0.44 टक्क्यांनी घसरण होत 17,550 अंकांवर बाजार सुरू झाला. सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 517.42 अंकांनी घसरण दिसून आली. सेन्सेक्स 58,499 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टीमध्ये 193 अंकांची घसरण दिसून आली. निफ्टी 17,422 अंकावर व्यवहार करत होता.

काय आहे धुळीचे वादळ? कसे निर्माण होतात धुळ कण

का कोसळला बाजार

अमेरिकेत मध्यवर्ती बँकेकडून व्याज दर वाढवण्याच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात मोठा दबाव निर्माण झाला असल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या परिणामी शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकदारांकडून सपाट्याने विक्री सुरू आहे.

या कंपन्यांमध्ये घसरण

बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, टायटन, कोटक बँक, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस यांचेही भाव घसरत आहेत. सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 268.50 लाख कोटी रुपये आहे.

वर्षभरात या कंपन्यांत मोठी घसरण

Zomato 19% घसरून 92 रुपयांवर आला

पेटीएम 6% खाली 903 रुपये

Nykaa र1750 वर 12% खाली आला

- Advertisment -

ताज्या बातम्या