Saturday, July 27, 2024
Homeजळगावजळगाव : कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमीवरही उपचार मिळेना

जळगाव : कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमीवरही उपचार मिळेना

जळगाव :

जळगाव जिल्ह्यात करोनाची भीती सर्वसामान्यांमध्ये तर आहेच मात्र सध्या ज्यांना आपण सर्वजण देव मानतो अशा डॉक्टरांनाही त्याची भीती वाटावी का? असा प्रश्न उपस्थित होत असून त्याचा प्रयत्य आज शहरात बघण्यास मिळाला. हरिविठ्ठल नगरातील एका ५५ वर्षीय इसमास पिसाळलेल्या कुत्र्यांनी हल्ला करून जबर जखमी केले, त्यास रिक्षामध्ये घेऊन नातेवाईकांनी अनेक खाजगी, सरकारी रूग्णालयात घेऊन गेले असता त्यास कुणीही हात लावण्यास तयार झाले नाही.

- Advertisement -

हरीविठ्ठल नगरमधील अशोक भिका वाणी (वय ५५) या व्यक्तीस पिसाळलेल्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या तोंडाचा एका बाजूच्या भाचा लचका तोडला, पायाचेही लचके तोडले. अशा गंभीर अवस्थेत रक्तबंबाळ झालेले असताना त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात धाव घेतली मात्र तेथेही उपचार झाले नाही.

शहरातील काही खाजगी दवाखान्यांमध्येही कुणी उपचारास होकार भरला नाही. करोनाच्या भीतीपेक्षा इतर आजारांवर वेळीच उपचार मिळत नसल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. टायफाईड, मलेरिया व अन्य प्रकारच्या आजारांवरही रूग्णालयांमध्ये उपचार होत नाहीत, परिणामी या सर्वांना शेवटचा पर्याय सरकारी हॉस्पिटलच असते. मात्र याठिकाणी सध्या करोनाचे रूग्ण येत असल्याने आजारांपेक्षा भीतीनेच सर्वसामान्य धास्ताले आहेत. यावर लोकप्रतिनिधींसह अधिकारी वर्गाने लक्ष देणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या