Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्यासिरमकडून लशीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव; फायझर नंतर जगातील दुसरी कंपनी ठरणार

सिरमकडून लशीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव; फायझर नंतर जगातील दुसरी कंपनी ठरणार

नई दिल्ली | प्रतिनिधी

करोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या पार्श्वभूमीवर COVID-19 लसीच्या मंजुरीसाठी जोर दिला जात आहे. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) यांनी भारतातून कोविड-19 लस “कोविशील्ड (Covishield)” च्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी भारतीय औषध महानियंत्रक (DGCI) समोर प्रस्ताव सादर केला आहे.

- Advertisement -

यासोबतच सीरम इंस्टीट्यूट (SII) करोना लशीचा प्रस्ताव सदर करणारी दुसरी कंपनी ठरली आहे. याआधी अमेरिकन कंपनी फाइजर (Pfizer) ने मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता.

याबाबत कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, क्लीनिकल परीक्षणामध्ये सिरमची लस प्रभावी असल्याचे समोर आले होते. यामध्ये कोविड-19 च्या गंभीर रुग्णांना चांगला फायदा याचा झाला आहे. चार परीक्षण करण्यात आले आहे यामध्ये चार मधून दोन परीक्षण ब्रिटन आणि एक-एक भारत आणि ब्राजील संबंधित आहेत.

भारतासोबत संपूर्ण जगातील 180 पेक्षा जास्त देशात करोना संक्रमण झाले आहे. संपूर्ण जगात सहा कोटी पेक्षा अधिक जनता COVID-19 च्या फेऱ्यात सापडली आहे. या महामारीत जगात 15 लाख पेक्षा अधिक जनतेचे मृत्यू झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या