Sunday, November 17, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार शहरात अवैधरित्या बोअरवेलचा वापर करणारी सात आस्थापने सिल

नंदुरबार शहरात अवैधरित्या बोअरवेलचा वापर करणारी सात आस्थापने सिल

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

नंदुरबार शहरात अवैधरित्या बोअरवेलचा वापर करणारे सात अस्थापने परिविक्षाधीन तहसीलदार पुलकित सिंह यांनी सिल केले आहेत. दरम्यान, बल्क वॉटर सप्लायर व पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर युनिट धारकानी दि. २७ जून पर्यंत केंद्रीय भूजल प्राधिकरण व राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे ऑनलाईन आवेदन करून रितसर नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

नंदुरबार शहर व तालुक्यातील अनेक खाजगी वॉटर फिल्टरधारक वाणिज्य वापरासाठी भूगर्भातून पाणी काढून विक्री करत असल्याची बाब परिविक्षाधीन तहसीलदार पुलकित सिंह यांच्या निदर्शनास आली. सदर भूगर्भातून पाणी काढुन व्यवसाय करणे तसेच सदर पाण्याचा स्त्रोत नष्ट होऊन पाणी टंचाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर वॉटर फिल्टरधारक केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतत पालन करतात किंवा अनधिकृत बोअरवेल तपासणीत अनियमितता आढळल्यास सदर बोअरवेल सिल करणे व विद्युत पुरवठा बंद करण्याच्या अधिकार आहे. तसेच बल्क वॉटर सप्लायर व पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर युनिट धारकानी केंद्रीय भूजल प्राधिकरण व राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे ऑनलाईन आवेदन करून रितसर नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.

तश्याप्रकारची कोणतीही परवानगी नाहरकत दाखले घेतलेले नसल्याची बाब श्री. सिंह यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे बल्क वॉटर सप्लायर व पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर युनिट धारकानी, दि.२७ जून २०२३ पर्यंत संबंधीत यंत्रणेची/विभागाची रितसर परवानगी घेऊन नाहरकत दाखले प्राप्त करुन घ्यावेत. तसेच आवश्यक शुल्क त्यांचेकडेस ऑनलाईन प्रक्रियेने जमा करुन त्याबाबत चलनाची प्रत आपल्या आस्थापनेत ठेवावी.

तसे न केल्यास नियमानुसार कार्यवाही करण्याचा इशारा श्री. सिंह यांनी दिला आहे. दरम्यान, याकामी आज नंदुरबार शहरातील अवैध बोअर वेल वापर करणा-या ७ आस्थापनावर कारवाई करण्यात आली. त्यात एस्सार पेट्रोल पंप परिसर, दंडपाणेश्वर मंदिर परिसर, हॉटेल पी.जी.सन्स समोर परिसर, करण चौफुली परिसर, बाबा रिसॉर्ट परिसर तसेच दोंडाईचा रस्ता परिसर भागातील वॉटर युनिट धारकांचा समावेश आहे. सर्व ७ युनिट सिल करण्यात आले आहेत.

सदर कार्यवाही तहसीलदार पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या