Saturday, May 18, 2024
Homeदेश विदेशलिफ्ट कोसळून सात जणांचा मृत्यू; एक जखमी

लिफ्ट कोसळून सात जणांचा मृत्यू; एक जखमी

अहमदाबाद | Ahmedabad

गुजरातमधील अहमदाबादमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. नव्या इमारतीचे काम सुरु असतांना लिफ्ट कोसळून सात जणांचा मृत्य झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज सकाळी ९.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या ९ व्या मजल्यावर काम सुरू असून कामगार लिफ्टमधून सामान वरच्या मजल्यावर नेत होते. दरम्यान, ७ व्या मजल्यावर पोहोचताच लिफ्ट तुटली. लिफ्टमध्ये एकूण ८ मजूर होते.

दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या