Saturday, September 28, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAccident News : कार आणि ट्रकचा भीषण अपघात; सात जण जागीच ठार

Accident News : कार आणि ट्रकचा भीषण अपघात; सात जण जागीच ठार

नवी दिल्ली | New Delhi

गुजरातच्या हिम्मतनगरमध्ये आज बुधवारी (दि.२५ सप्टेंबर) सकाळी कार आणि ट्रकचा (Car and Truck) भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sanjay Raut : “अमित शाह उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेताय याचा अर्थ…”; संजय राऊतांचे टीकास्त्र

याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातमधील (Gujarat) हिम्मत नगरमध्ये बुधवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. गुजरातच्या हिम्मतनगर येथे भरधाव वेगात असलेल्या कारने समोरून जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. अपघातावेळी कारचा वेग एवढा होता की कारचा अर्धा भाग ट्रकवर जाऊन आदळला. या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या भयंकर घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची ‘जोर’ धार; नागरिकांची धावपळ

दरम्यान, अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून पोलीस व अग्निशमन विभागाच्या (Police and Fire Department) कर्मचाऱ्यांनी कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले. तसेच वाहनातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर जखमी आणि मृतांची ओळख पटली असल्याचे माहिती समोर आली असून मृतदेह (Dead Body) आल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या