Friday, November 22, 2024
Homeक्राईमNashik Crime News : रकमेत फेरफार करुन पैसे लाटले

Nashik Crime News : रकमेत फेरफार करुन पैसे लाटले

धनादेश वटवून घेणाऱ्यास सात वर्षांचा कारावास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बँकेत (Bank) जमा करण्यासाठी दिलेल्या धनादेशावरील (Check) रकमेत फेरफार करून हा धनादेश स्वत:च्या खात्यावर वटवून घेतल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दाेषी धरत सात वर्षे कारावासाची शिक्षा (Punishment) ठोठावली असून, २२ हजारांचा दंडही सुनावला. या खटल्यात हस्ताक्षर तज्ज्ञांची साक्ष महत्त्वाची ठरली असून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची साक्ष नोंदविली गेली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Accident News : बस-ट्रकच्या अपघातात २५ जण जखमी

याबाबत अधिक माहिती अशी की, अजिज महंमद शेख (रा. महात्मानगर, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. राधाकिसन धीरुराम धांजल (रा. पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी टाटा फायनान्सचे कर्ज घेतलेले होते. त्याचे हप्ते फेडण्यासाठी त्यांनी आरोपी शेख यास बँक ऑफ महाराष्ट्राच्या पंचवटी शाखेचे (Panchvati Branch) ३३ धनादेश तयार करण्यास सांगितले होते. आरोपी शेख याने ३२ चेक तयार करून त्यावर ‘अकाऊंट पेयी’ असे न लिहिता एका चेकवर स्वत:च प्राप्तकर्ता(सेल्फ) असे लिहिले. तसेच १६ हजार ४५० रुपयांच्या रकमेत १६ च्या आधी ६ अंक लिहिला. त्यामुळे ६ लाख १६ हजार ४५० रुपयांचा चेक बनवून त्याने तो स्वत:च्या खाते असलेल्या महात्मानगर येथील स्टेट बँक ऑफ बिकानेर ॲण्ड जयपूर येथे वटवून घेत अपहार केला होता.

हे देखील वाचा : नाफेड-एनसीसीएफच्या कांदा खरेदीतील गैरव्यवहाराची ईडी व सीबीआयमार्फत चौकशी करावी

याप्रकरणी पंचवटी पोलिसात (Panchvati Police) अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करीत पाेलिसांनी (Police) न्यायालयात (Court) दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता सुनीता चितळकर यांनी ११ साक्षीदार तपासले. यात हस्ताक्षर तज्ज्ञ संतोष कान्हेरी यांनी आरोपीचे हस्ताक्षरांसंदर्भात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. विशेषत: सरकारी वकीलांनी कान्हेरी यांची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदवून घेतली. आरोपींविरोधातील पुरावे सिद्ध झाल्याने न्यायालयाने शेख यास सात वर्षे साधा कारावास व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यातील २१ हजार रुपये तक्रारदारास देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या