दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
एकीकडे राज्यभरात उन्हाच्या (Heat) तीव्रतेमुळे पाण्याचा (Water) वापर वाढला आहे. तर दुसरीकडे तापमानामुळे जलस्तर घटतांना दिसत आहे. या तापमानाचा फटका नाशिक जिल्ह्याला देखील बसला असून जिल्ह्यातील (Nashik District) अनेक भागांतील जलसाठा खालावला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट आणखी गडद झाले आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) त्रिंगलवाडी येथील एका गरोदर महिलेला एका पाण्याच्या हंड्यासाठी जवळपास दोन किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने टीव्हीद्वारे बघितले होते. अशातच आता ही घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील (Peth Taluka) कहांडोळपाडा (Kahandolpada) येथे हंडाभर पाण्यासाठी अबालवृद्धांसह महिला आणि पुरुषांची चढाओढ सुरु असल्याचे चित्र समोर आले आहे.
हे देखील वाचा : Nashik News : पेठमधील वांगणी शिवारात लाखोंचा गुटखा जप्त
सर्वाधिक पाऊस होऊन देखील पाण्याचे लोट दऱ्या खोऱ्यातून वाहणाऱ्या पेठ तालुक्यात सध्या हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थ मोहताज झाल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या तालुक्यातील अनेक गावांत भीषण पाणीटंचाई जाणवत असून एक-एक हंडाभर पाण्यासाठी महिलांसह पुरुषांना वणवण करावी लागत आहे. अशीच परीस्थिती सध्याच्या घडीला कहांडोळपाडा येथे निर्माण झाली असून हातातील सर्व कामे सोडून विहिरीवर अबालवृद्धांसह महिला व पुरुषांना पाणी भरण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे (Water Shortage) हे चित्र यंत्रणेच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.
हे देखील वाचा : येवल्यात भरधाव वाहनच्या धडकेत पाच वर्षीय मुलगा ठार
दरम्यान, नुकतीच जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी मतदानाची (Poling) प्रक्रिया पार पडली आहे. गेल्या महिनाभरापासून सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. त्यामुळे त्यांना आपल्या मतदारसंघांकडे लक्ष देता येत नव्हते. पंरतु, आता मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर या लोकप्रतिनिधींनी आपआपल्या मतदारसंघातील पाणीटंचाईसह इतर प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे असताना अद्याप काही लोकप्रतिनिधींना मतदारसंघाकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे निदान कहांडोळपाडा येथील पाणीटंचाईचे भीषण वास्तव बघून येथील लोकप्रतिनिधींसह इतर मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी आपआपल्या मतदारसंघांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
हे देखील वाचा : Nashik News : शहर आयुक्तालय हद्दीतील ४२५ टवाळखोरांवर कारवाई