Saturday, June 15, 2024
HomeमनोरंजनBox Officeवर शाहरुखच्या Jawanचं वादळ, रिलीजच्या चौथ्या दिवशी केली छप्परफाड कमाई

Box Officeवर शाहरुखच्या Jawanचं वादळ, रिलीजच्या चौथ्या दिवशी केली छप्परफाड कमाई

मुंबई | Mumbai

- Advertisement -

शाहरुख खान स्टारर बहुप्रतिष्ठित चित्रपट ‘जवान’ ७ सप्टेंबरला देशभरातील सर्व सिनेमागृहात प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून धमाकेदार कामगिरी करत असलेल्या या सिनेमाने रिलीजच्या चौथ्या दिवशी तर छप्परफाड कमाई केली आहे. तीन दिवसांपेक्षा चौथ्या दिवशी या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली आहे.

एका रिपोर्टनुसार, ‘जवान’ या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ७५ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी ५३ कोटी, तिसऱ्या दिवशी ७७.८३ कोटींची कमाई केली आहे. तर रिलीजच्या चौथ्या दिवशी या सिनेमाने तब्बल ८१ कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने २८७.०६ कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा चित्रपट ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. (Shah Rukh Khan Jawan Records)

शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्ष खूपच खास आहे. त्याच्या ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाने वर्षाच्या सुरुवातीलाच इतिहास रचला आहे. आता त्याचा ‘जवान’ हा सिनेमा सिनेमागृहात धमाका करत आहे. या सिनेमाचं कथानक, दिग्दर्शन आणि शाहरुखचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. बॉलिवूडचा बादशाह असणाऱ्या शाहरुखची जगभरात चर्चा आहे. शाहरुखच्या ‘जवान’चे अनेक सिनेमागृहात हाऊसफुल्ल शो होत आहेत. ‘जवान’ या सिनेमाने ‘पठाण’, ‘गदर २’ असे या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांना मागे टाकलं आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खानने केली आहे. सिनेमा ७ सप्टेंबरपासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून प्रमुख भूमिकेत शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी आहेत. तसेच हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या