मुंबई | Mumbai
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Actor Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असून तो शुटींगसाठी अमेरिकेत (America) गेला होता. मात्र, अमेरिकेत शुटींग करत असतानाच शाहरूखचा अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे…
Accident News : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसला, ५ जणांचा चिरडून मृत्यू
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात शाहरूखच्या नाकाला (Nose) जबरदस्त मार लागला असून अपघातानंतर त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये हा अपघात झाला असून त्याच्या नाकाची शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात आली आहे.
NCP Crisis : अमोल कोल्हे देणार खासदारकीचा राजीनामा; आज शरद पवारांची घेणार भेट
दरम्यान, शाहरुखच्या नाकाला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला होता. त्यानंतर रक्तस्त्राव थांबण्यासाठी त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. तसेच शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी शाहरुख खानला काही दिवसांची सक्तीची विश्रांती (Relaxation) घेण्याचा सल्ला दिला असून तो भारतात परत आला आहे. तर शाहरुख खानकडून याबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
Rain Update : राज्यात आजपासून पाच दिवस जोरदार पाऊस