इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri
इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या शालिनी खातळे यांना एकुण झालेल्या १७२२४ मतांपैकी १०१५१ इतकी मते मिळाल्याने विजयी झाल्या. तर प्रतिस्पर्धी उमेदवार मधुमालती मेंद्रे यांना ४२८१ इतकी मते मिळाल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला.
नगराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत शालीनी खातळे यांनी भाजपाच्या मधुमालती मेंद्रे यांचा ५८७० मतांनी पराभव केला. या निवडणुकीत शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) युतीचे १८ नगरसेवक विजयी, तर भाजपचे -२ व तर शिवसेना उद्धव ठाकरे यांचा १ उमेदवार विजयी झाला
गेली ३० वर्ष नगरपरिषदेवर सत्ता अबाधित ठेवणाऱ्या माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांचा व त्यांनी उभ्या केलेल्या पॅनलचा दारुण पराभव झाला. माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी ३० वर्षापासून शिवसेनेचा ( उबाठा गट ) नगरपरिषदेवर सत्ता काबीज ठेवली होती. मात्र ऐन वेळी इंदुलकर यांनी भाजपात प्रवेश करून निवडणुक लढवल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे बोलले जात आहे.
माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगेश शिरोळे यांनी दारुण पराभव केला. तर ३० वर्षापासून संजय इंदुलकर यांना टक्कर देणारे माजी नगराध्यक्ष फिरोज पठाण दणदणीत विजयी झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) १३ उमेदवार, शिवसेनेचे ( शिंदे गट ) ५ उमेदवार, भाजपाचे २ उमेदवार, शिवसेनेचे ( उबाठा गट ) १ उमेदवार निवडून आले.
इगतपुरी नगरपरीषदेतील विजयी उमेदवारांची नावे
प्रभाग क्रमांक १ ( अ ) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) युवराज भोंडवे यांना ५९९ मते मिळाल्याने विजयी झाले
प्रभाग क्रमांक १ ( ब ) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अंजुन कुरेशी यांना ५९९ मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक २ ( अ ) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर आढार यांना ९६६ यांना मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक २ ( ब ) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नाझनीन खान यांना ९४१ मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक ३ ( अ ) मधील शिवसेनेचे वैशाली करपे यांना ८९२ मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक ३ ( ब ) मधील शिवसेनेचे रोहीदास डावखर यांना ७९३ मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक ४ ( अ ) मधील शिवसेनेचे माला गवळे यांना ५४३ मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक ४ ( ब ) मधील शिवसेनेचे ( उबाठा गट ) भुषण जाधव यांना ५६० मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक ५ ( अ ) मधील शिवसेनेचे उमेश कस्तुरे यांना १२०० मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक ५ ( ब ) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे निकत सैय्यद यांना ११०५ मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक ६ ( अ ) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मयुरी पुरोहित यांना १८०३ मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक ६ ( ब ) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आशा थोरात यांना १७५५ मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक ६ ( क ) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे फिरोज पठाण यांना १२०२ मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक ७ ( अ ) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सतिष मनोहर यांना ६०२ मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक ७ ( ब ) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे भारती शिरोळे यांना ७२१ मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक ८ ( अ ) मधील भाजपाच्या वंदना रोकडे यांना ४६६ मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक ८ ( ब ) मधील शिवसेनेचे राजेंद्र जावरे यांना ६८८ मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक ९ ( अ ) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आशा भडांगे यांना १२२२ मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक ९ ( ब ) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगेश शिरोळे यांना १०७२ मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक १० ( अ ) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ललीता लोहरे यांना ७१३ मते मिळाल्याने विजयी.
प्रभाग क्रमांक १० ( ब ) मधील भाजपाचे किरण बिन्नर यांना ७८८ मते मिळाल्याने विजयी.
राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या माध्यमातुन इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या आधीच सुमारे १० कोटी रुपयांची विकासकामे मंजुर करून शहरात अनेक भागात कामांना सुरवात केल्याने मतदारांवर चांगलाच प्रभाव पडला होता. सर्वच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ते स्वतः प्रचार करत होते. त्याच बरोबर माजी जि.प. सदस्य गोरख बोडके, संदिप गुळवे, ज्ञानेश्वर लहाणे, प्रशांत कडू, शहराध्यक्ष वसिम सय्यद, महेश शिरोळे, विनायक पाटील, पांडूरंग वारुगंसे, अमोल बोरावके यांच्यासह अनेक पदाधिकारी प्रचारात सक्रिय होते.
शिवसेना ( शिंदेगटाचे ) माजी खासदार हेमंत गोडसे व माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शालिनी खातळे व पदाधिकारी यांना घेऊन उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. त्यामुळे या विजयाच्या घौडदोडीत मेंगाळ यांचा मोठा सिहांचा वाटा ठरला.




