Wednesday, January 7, 2026
HomeनगरSonai : शनैश्वर देवस्थानचा कारभार सोपवला विश्वस्त मंडळाकडे

Sonai : शनैश्वर देवस्थानचा कारभार सोपवला विश्वस्त मंडळाकडे

सोनई |वार्ताहर| Sonai

श्रीक्षेत्र शिंगणापूर येथे जिल्हाधिकारी यांच्या वतीने आलेल्या प्रतिनिधींनी विश्वस्त मंडळाकडे गुरुवार दि. 18 रोजी देवस्थानचा कारभार दिला आहे. उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठाने 12 डिसेंबर रोजी विश्वस्त मंडळाकडे शनैश्वर देवस्थानचा कारभार देण्याचा आदेश दिला. त्यानुसार अहिल्यानगर जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी उपजिल्हाधिकारी भूसंपादनचे अतुल चोरमारे, अहिल्यानगरचे लेखाधिकारी गणेश खेडकर व शितल सावळे या प्रतिनिधींनी देवस्थान कार्यालयात येऊन विश्वस्त मंडळाकडे येथील कारभाराची सूत्रे दिली. कार्यकारी समितीने बँक व्यवहार तसेच वापरलेले चेक संदर्भातील माहिती, दानपात्रातील हिशोब, लॉकर संबंधी कागदपत्रे विश्वस्त मंडळाच्या ताब्यात दिली आहेत.

- Advertisement -

यावेळी देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, चिटणीस आप्पासाहेब शेटे, कोषाध्यक्ष दीपक दरंदले, डॉ. शिवाजीराव दरंदले, छबुराव भुतकर, बाळासाहेब बोरुडे, शहाराम दरंदले, सुनीता आढाव, पोपट शेटे, पोपट कुर्‍हाट, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले हे उपस्थित होते. देवस्थानच्या विश्वस्त मंडळांने कारभार हाती घेताच देवस्थानच्या कर्मचार्‍यांचा नोव्हेंबर महिन्याचा रखडलेला पगार लगेच कर्मचार्‍यांच्या खात्यात वर्ग केला त्यामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते.

YouTube video player

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...