शनिशिंगणापूर |वार्ताहर| Shani Shingnapur
श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनीदेवास अर्पण करण्यासाठीचे तेल ब्रॅण्डेड कंपन्यांचे वापरण्याची सक्ती करुन चार-पाच दिवस झाले असले तरी सुसुत्रतेअभावी येथील अधिकारी व कर्मचार्यांची या निर्णयाबाबत संभ्रमावस्था आहे. घेतलेल्या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामध्ये तेल कोणत्या कंपनीचे आहे? ते दर्जेदार आहे की नाही याबाबत सखोल तपशीलवार माहिती मिळत नसल्याने भाविकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
देवस्थानने दुकानदार, विक्रेते यांची संयुक्त बैठक घेऊन यातील तेल अर्पण करण्याच्या संदर्भात शंका निरसन करून जनजागृती करणे गरजेचे आहे. अन्न व भेसळ अधिकार्यांना देखील बैठकीमध्ये निमंत्रित करून भेसळयुक्त तेल कसे ओळखावे याची माहिती द्यायला हवी. ब्रँडेड तेलाच्या आडून बनावट स्टिकर लावून भविष्यात मोठे रॅकेट तयार होणार नाही याची काळजी घेतली जाणे आवश्यक आहे.