Wednesday, February 4, 2026
Homeनगरदीपावली सुट्ट्यांच्या काळात शिंगणापूरला 21 लाखांचे दान

दीपावली सुट्ट्यांच्या काळात शिंगणापूरला 21 लाखांचे दान

शनिशिंगणापूर |वार्ताहर|Shani Shingnapur

शनिशिंगणापूर येथील दिवाळीच्या सुट्टीच्या काळात जवळपास 15 दिवसात दानपात्रांमध्ये 21 लाख रुपयांचे दान जमा झाले. शासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत दानपात्रातील दान रकमेची मोजदाद करण्यात आली. धर्मदाय आयुक्तच्या अधिकार्‍यांना कामाचा व्याप असल्यामुळे त्यांना वेळ न मिळाल्याने आठ दिवसानंतर दानपेटीची रक्कम मोजली जाणारी रक्कम सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली 15 दिवसांनी मोजण्यात आली. दानपात्रात शनी भक्तांनी 20 लाख 56 हजार 878 रुपये व सुवर्ण मौल्यवान वस्तू दानपेटीत जमा मिळाल्याची माहिती प्रशासक देवस्थानच्या प्रशासकीय अधिकारी यांनी दिली.

- Advertisement -

याप्रसंगी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे व देवस्थानचे सचिव राजेंद्र वाकचौरे यांच्यासह समिती उपस्थित होते. शनि देवासमोर असलेल्या उदासी महाराज मठात कर्मचार्‍यांच्या मदतीने हे 18 दानपात्र उघडण्यात आले.ती दानपत्राची रक्कम प्रशासकीय अधिकार्‍यांच्या निर्णयानुसार बँक खात्यात भरली आहे.

YouTube video player

दीपावलीच्या सुट्ट्या निमित्ताने शनि भक्तांचा ओघ वाढला आहे. राहुरी-शिर्डी शिंगणापूर मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे. भरभरून शनिभक्तांनी दानपेटीत गुप्तदान केले आहे. सध्या शनिचरणी दान स्वरूपात मोठ्या प्रमाणात रक्कम संकलित होताना दिसत आहे.

ताज्या बातम्या