Sunday, January 25, 2026
HomeनगरShani Shingnapur : बनावट अ‍ॅप संदर्भात सायबर शाखेने घेतली तपासाला गती

Shani Shingnapur : बनावट अ‍ॅप संदर्भात सायबर शाखेने घेतली तपासाला गती

सोनई |वार्ताहर| Sonai

शिंगणापूर येथे बनावट अ‍ॅप संदर्भात अहिल्यानगर सायबर शाखेने शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर सोमवार दि. 14 रोजी सकाळीच तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी शिंगणापूर येथे घटनास्थळाची पाहणी करून चौकशी केली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे व आमदार सुरेश धस यांनी शिंगणापूर येथे देवस्थानचे नाव वापरून कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अ‍ॅप घोटाळ्यावर कारवाईचा इशारा दिला. शनिशिंगणापूर येथे शनिदेवाची पूजा अभिषेक व तेल अर्पण संदर्भात खोटा मजकूर ऑनलाईन पसरवला व भाविकांची व देवस्थानची फसवणूक केल्याप्रकरणी पाच अ‍ॅप धारक व साथीदारावर अहिल्यानगर सायबर शाखेने शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

YouTube video player

बनावट अ‍ॅपधारक व त्यांचे साथीदारांनी ऑनलाईन दर्शन पूजा, अभिषेक, तेल चढावा बुकिंग करीता शनैश्वर देवस्थान व धर्मदाय आयुक्त यांची कोणतीही परवानगी घेतली नसून भाविकांकडून ऑनलाईन पद्धतीने अनियमित दराने स्वतःच्या फायद्यासाठी रकमा स्वीकारल्या होत्या. त्यामुळे अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवार दि 14 रोजी सकाळीच सायबर शाखेचे तपासी अधिकारी पेंदाम यांनी शिंगणापूर येथे येऊन अ‍ॅपसंदर्भातील माहिती, सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून अधिकार्‍यांकडुन कागदपत्रांची माहिती घेतली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

लवकरच तपास पूर्ण होणार
लवकरच तपास पूर्ण होणार असून गुन्ह्यातील सहभागी असलेल्या आरोपींना ताब्यात घेतले जाईल व याविषयीचा टेक्निकल तपास चालू असल्याने याची माहिती देता येत नाही.
– मोरेश्वर पेंदाम, पोलीस निरीक्षक सायबर शाखा अहिल्यानगर

घोटाळा किती कोटींचा ?
देवस्थानचा पूर्ण वर्षांचा टर्नओव्हर सुमारे 35 कोटींचा आहे असे बोलले जाते परंतु अ‍ॅपच्या घोटाळ्या बाबत चर्चा 100 ते 500 कोटींचा घोटाळा असल्याचे आरोप होत आहे. आता गुन्हा दाखल झाल्याने चौकशीत पूर्ण सत्य बाहेर येणार असल्याची आशा शनिभक्त करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime : सैंदाणेंचा कारागृहातील मुक्काम पुन्हा वाढला; जामीन फेटाळला

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik कोविड काळात नाशिक जिल्हा रुग्णालय व मालेगाव सामान्य रुग्णालयातील आयसीयू (अतिदक्षता कक्ष) उभारण्यात कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटकेनंतर तुरुंगात असलेले...