Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याशंकरराव बर्वे यांचे करोना संसर्गाने निधन

शंकरराव बर्वे यांचे करोना संसर्गाने निधन

नाशिक | प्रतिनिधी

Nashik

- Advertisement -

गाडगे बाबा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन, सावाना चे पदाधिकारी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव बर्वे (Shankarrao Barve) यांचे करोनाच्या संसर्गाने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते.

त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा अहवाल करोनाबाधित आढळून आला असल्याचे समजते. गुरुवारी (दि.16) दुपारी त्यांना ताप आला होता यासोबतच त्यांची साखरदेखील वाढली होती.

करोनाचे लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांना मविप्र संचलित डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंड असा परिवार आहे.

1980 साली मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते निळु फुले यांनी युवक संघटनेच्या कार्यालयास संदिच्छा भेट दिली त्या प्रसंगी स्वागत करतानां शंकरराव बर्वे समवेत मनोहर जाधव व रमाकांत शिरसागर आदि.

- Advertisment -

ताज्या बातम्या