राज्याच्या राजकारणात अनेक उलथापलथी घडविण्याची ताकद असलेले नेते म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार.
त्यांनी राज्याच्या राजकारणात तर 2019 च्या विधानसभेनंतर कमाल घडविली. राज्याच्या राजकारणात पवारांचा शब्द महत्त्वाचा असेल आणि मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णयही तेच घेणार असा अंदाज आम्ही वर्तविला होता, तोही खरा ठरला. 5 ऑक्टोबर 2018 त्यांची राजकीय स्थिती झपाट्याने सुधारत आहे. कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार त्यांचा राजकीय वनवास संपलेला आहे.
12 डिसेंबर 1940 रोजी बारामती तालुक्यात 7 वाजता त्यांचा जन्म झाला. जन्मराशी मेष तर नक्षत्र भरणी-4. कुंडलीनुसार 6 ऑक्टोबर 2035 पर्यंत बुधाची महादशा त्यांना साथ देणारी आहे. केवळ आरोग्याच्या तक्रारी त्यांच्या वाटचालीत अडथळा निर्माण करू शकतात.
आरोग्याची काळजी घेतल्यास आणि त्यांनी टाकलेले राजकीय डाव नियोजनपूर्वक पडले तर त्यांना रोखणे त्यांच्या राजकीय विरोधकांना कठीण ठरेल. त्यांच्या हातून महत्त्वाची राजकीय भुमिका पार पडणार, असे योग आहेत.
राजकीयदृष्ट्या टक्कर देणारे योग त्यांच्या पत्रिकेत आहेत. विशेषत: त्यांची राजकीय बुद्धी त्यांना साथ देताना दिसेल. मित्र जोडण्याचे म्हणजे विरोधकांची मोट बांधण्याचे योग त्यांच्या हातून घडतील, असे योग आहेत.
त्यांनी घेतलेले कार्य बुद्धीचातुर्याच्या बळावर यशस्वी ठरल्यास त्यांना सर्वोच्च सन्मानाचे योग आहेत.