श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
संपूर्ण जगात भारताची लोकशाही ही आदर्श लोकशाही म्हणुन प्रसिध्द आहे. मात्र गेली 10 वर्षात मोदी सरकारने लोकशाही मोडीत काढून हुकूमशाही पद्धतीने राजकीय वाटचाल सुरु केली आहे. हीच हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी व लोकशाहीला वाचविण्यासाठी सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी माझा आत्मा 50 नव्हे तर 56 वर्ष संपूर्ण राज्यात भटकतोय. असा टोला खा. शरद पवार (MP Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लगावला.
आज श्रीगोंदा (Shrigonda) येथील संत शेख महंमद महाराज याच्या प्रांगणात सकाळी 11:00 वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh lanke) यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत खा. पवार बोलत होते. मोदी सरकारला आपल्या विजयाची खात्री नसल्यामुळे आपल्याला प्रचारासाठी जास्त वेळ मिळावा यासाठी महाराष्ट्राची निवडणूक पाच टप्प्यात घेतली आहे. तसेच निवडणूक वेळापत्रक बदललं सध्या भारतात लोकशाही संकटात आहे. संसदीय लोकशाहीची चिंता संपूर्ण देशात निर्माण झाली आहे. अशी परस्थिती निर्माण झाली असताना महानगरपालिका नगर परिषद, जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक का झाल्या नाहीत. एव्हढेच काय तर पुढें एक काळ विधान सभेच्या निवडणुका टाळल्या जातील हे लवकरच ऐकायला मिळेल. मात्र या निवडणूकीत लोकशाही टिकवण्याची जबाबदारी आपण घ्यायची आहे. अनेक प्रधानमंत्री कालखंडात मी काम केलय. यासोबत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शेतकरी प्रश्न आणि सर्वसामान्य लोकांच्या अडचणी संदर्भात मी प्रत्यक्ष चर्चा करून अडचणी सोडवल्या आहेत. असे शरद पवार (MP Sharad Pawar) बोलत होते.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) बोलताना म्हणाले की, इंग्लीश बोलण्यापेक्षा संसदेत सामान्यांचे काम केले का? असा टोला त्यांनी सुजय विखेंना (Sujay Vikhe) लगावला आहे. यावेळी प्रभु राम, कृष्ण, आणि तेहत्तीस कोटी देवांनीच ठरवलय की मोदींना पाडायचे. सबसे फास्ट आणि खोट बोलणारा पंतप्रधान मोदीच आहेत. त्यांना खोट बोलण्यासाठी गोल्ड मेडल मिळेल. मोदी यांची हुकूमशाही दडपशाही सुरू झाली आहे. या हुकूमशाही विरोधात लोकशाही असे चित्र सुरु आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या तेजाने तळपून देशवासीयांना अधिकार दिले. ते संविधान बदलण्याची भूमिका मोदींनी हाती घेतली आहे. ते कदापी होऊ द्यायचे नाही असे राऊत यांनी सांगितले. यावेळी मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), आमदार रोहित पवार उपस्थित होते.