Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar : अजित पवारांच्या मेळाव्याबद्दल शरद पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ही...

Sharad Pawar : अजित पवारांच्या मेळाव्याबद्दल शरद पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ही जुनी पद्धत कायम राहिली असती तर…

पुणे | Pune
बारामतीत पहिल्यांदाच पवारांचे २ पाडवा मेळावे झाले. गोविंद बागेत शरद पवार आणि काटेवाडीत अजितदादांचा पाडवा मेळावा पार पडला. शरद पवार यांच्या पाडवा मेळाव्याला अनेकांनी हजेरी लावली होती. राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर यंदा बारामतीत दिवाळी पाडव्यालाही दोन वेगवेगळे पाडवे साजरे करण्यात आले. यातला एक गेली ५७ वर्ष शरद पवारांसोबत साजरा केला जातो तर गेल्याच वर्षी फुटलेल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेल्या अजित पवार यांचा पहिला स्वतंत्र पाडवा काटेवाडीच्या बंगल्यात आयोजित करण्यात आला होता.

जे ओरिजनल ते ओरिजनल… साहेब ते साहेब… याची सुरुवात साहेबांनी केली होती, अशा प्रतिक्रिया शरद पवारांच्या पाडव्याच्या मांडवात ऐकायला मिळत होत्या. पाडवा मेळावा झाल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या पाडवा मेळ्यावर भाष्य केले. अनेक वर्षांपासूनची पाडवा मेळाव्याची परंपरा कायम राहायला हवी होती, असा खेद शरद पवार यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हे ही वाचा: Sharad Pawar : शरद पवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले, पोलिस दलाच्या गाड्यातून रसद पुरवली जात आहे

काय म्हणाले शरद पवार?
बारामतीमध्ये दोन पाडवा व्हायला नको अशी लोकांची भावना आहे. पाडव्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. पाडवा या ठिकाणी साजरा केला जातो. या प्रांगणात आम्ही सर्वजण जमतो, ही जुनी पद्धत आहे. ही कायम राहिली असती तर मला आनंद झाला असता. पण आता ठीक आहे. लोकांना डबल ठिकाणी जावे लागले. त्यांना त्रास झाला. त्यामुळे मी अस्वस्थ आहे, असे शरद पवार म्हणाले.

रोहीत पवार काय म्हणाले?
अजित पवारांकडे दिवाळी पाडव्यासाठी आलेली गर्दी म्हणजे सर्व लाभार्थी आहेत. तिथे आलेल्या गाड्या तुम्ही पाहा एक एक कोटीच्या गाड्या आहेत, शरद पवारांकडे आलेले लोक हे सर्व सामान्य लोक आहेत, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. घर फुटण्याचे अजित पवार यांना जर आज दुःख होत असेल तर याची सुरुवात कोणी केली. याची सुरुवात लोकसभेला त्यांनीच केली. युगेंद्र पवार यांनी लोकसभेला सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला. सुप्रिया सुळे यांचे त्यांनी काम केले ते काम पाहूनच पवार साहेबांनी त्यांना बारामतीमधून विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या