Wednesday, November 13, 2024
Homeनगरसरकारचे कृषी विषयक धोरण उद्योग धार्जिणे

सरकारचे कृषी विषयक धोरण उद्योग धार्जिणे

विधानसभेत सत्तापरिवर्तनाची गरज

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

संपूर्ण देशाच्या भुकेचा प्रश्न सोडवणार्‍या बळीराजावर आत्महत्येची वेळ आली आहे. केंद्र सरकारमध्ये सत्तेत असताना या प्रश्नाची कारणमिमांसा करून शेतकर्‍यांना आर्थिक अडचणीत लोटणार्‍या कर्जबाजारीपणावर उपाय म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये आपण 70 हजार कोटींची ऐतिहासीक कर्जमाफी मिळवून दिली. आज राज्यातील परिस्थिती भयावह आहे. सोयाबीन, कापूस, ऊस उत्पादक शेतकर्‍यांना खर्चाच्या तुलनेत उत्पन्न पदरात पडत नाही. सरकारचे कृषीविषयक धोरण उद्योग धार्जिणे आहे.त्यामुळे शेतकर्‍यांवर ही वेळ आली आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी केले.

- Advertisement -

शेवगाव येथे ते बोलत होते. पवार म्हणाले, राज्यातील कष्टकरी, शेतकरी यांच्यादृष्टीने आशादायक चित्र निर्माण करण्यासाठी व युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी वचनबध्द आहे. आठ महिन्याच्या काळात राज्यातील 900 महिला भगिनींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात हे अत्याचार सहन करणे अशक्य आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी लोकसभेत हाणून पाडला. लोकसभा निवडणुकीत मोदींनी दिलेला चारशे पार जागांचा नारा महाराष्ट्रात 48 पैकी 31 खासदार त्यांच्या विरोधात देवून केंद्रातील सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम केले.

आता विधानसभेत सत्ता परिवर्तनाची गरज आहे. ते करुन जागरुक मतदार असल्याचे दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले. कांगो म्हणाले, आपल्या सर्वांना राज्यावर आलेले संकट दूर करायचे आहे. देशातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न घटले आहे. शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. देशाला व राज्याला आर्थिक अधोगतीकडे नेणार्‍या एका मोठया राजकीय षडयंत्राचे आपण बळी आहोत. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या मुंबईचे आर्थिक महत्व कमी करुन ते अहमदाबाद व गुजरातकडे वळवून मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याचे काम ही राज्यातील आणि केंद्रातील सरकारे करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

सरकार बदलल्याशिवाय शांत बसणार नाही
या वयातही मी फिरतो असे ओमराजे निंबाळकर म्हणाले, पण मी काय म्हातारा झालोय का? खरं तर हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही आणि शांतही बसणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार परांडा येथील सभेत म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या